अशी बदला तुमच्या आधार कार्डवर असणारी जन्मतारीख, Aadhar Card Date Of Birth Change

2 Min Read
Aadhar Card Date Of Birth Change Process Documents

Date of Birth Change in Aadhar Card : जर तुमच्या आधार कार्डमध्ये जन्मतारीख चुकीची असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील जन्मतारीख बदलू शकता. पण लक्षात ठेवा की आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलणे एकदाच शक्य आहे. तुम्ही आधार कार्डमध्ये जन्मतारीख एकदाच बदलू शकता. (how to change date of birth in aadhar card?).

तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डमधील जन्मतारीख बदलायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आधार कार्डमधील जन्मतारीख बदलण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

आधार कार्डमधील जन्मतारीख बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामध्ये, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, पासपोर्ट, बँक पासबुक, विद्यापीठाचे प्रमाणपत्र. (तुम्ही यापैकी कोणतेही कागदपत्र वापरू शकता).

आधार कार्डवरील जन्मतारीख बदलण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

आधार कार्डमधील जन्मतारीख बदलण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • स्टेप 1- तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जा.
  • स्टेप 2- करेक्शन फॉर्म भरा: करेक्शन फॉर्म मागून घ्या आणि तो व्यवस्थित भरा. त्यात तुमचे नाव, आधार क्रमांक आणि जन्मतारीख लिहा.
  • स्टेप 3- फी जमा करा: आधार कार्डवरील जन्मतारीख बदलण्यासाठी, तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.  ते शुल्क जमा करा.
  • स्टेप 4- स्लिप घ्या: आधार केंद्रावर तुम्हाला एक URN (युनिक रेकॉर्ड नंबर) स्लिप दिली जाईल. ती स्लिप जपून ठेवा, कारण त्या स्लिपद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील जन्मतारीख बदलण्याच्या प्रोसेसची स्थिती ऑनलाइन चेक करू शकता.
  • स्टेप 5- आधार डाउनलोड करा: आधार कार्डवरील जन्मतारीख बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही UIDAI वेबसाइटवरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील चुकीची जन्मतारीख दुरुस्त करू शकता. हे लक्षात ठेवा की, आधार कार्ड वरील जन्मतारीख एकदाच बदलता येत असल्याने त्यासाठी योग्य कागदपत्रे आणि योग्य माहितीसह अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article