अदिती तटकरे यांनी जाहीर केली लाडक्या बहिणींसाठीची वेतन योजना – Aditi Tatkare Unveils Schedule And Pay Scheme for Third Installment of Majhi Ladki Bahin Yojana

3 Min Read
Aditi Tatkare Announces Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Date And Pay Scheme

Aditi Tatkare Announces Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Date: येत्या रविवारी म्हणजेच दि.29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. आणी त्याच कार्यक्रमातून माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे दि. 29 सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. काही महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये तर काही महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत. तुमच्या खात्यात नेमके किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात… (On 29th September 2024, the third installment of Majhi Ladki Bahin Yojana will be distributed in Raigad. Some women will receive ₹1500, while others may get ₹4500 directly in their bank accounts).

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबरला रायगडच्या माणगाव तालुक्यात माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 29 सप्टेंबर पासूनच डीबीटी द्वारे महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. आणी 2 ते 3 दिवसांच्या आत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी म्हणजे त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात कोणती अडचण येणार नाही.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

पुण्यात 17 ऑगस्टला माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडला होता. त्याद्वारे लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्यात 1 कोटी 7 लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित करण्यात आला होता. त्यानंतर 31 ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडला आणी त्यातून महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत करण्यात आला होता. आता 29 सप्टेंबरला रायगडमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यादरम्यान महिलांना तिसऱ्या हफ्त्याचा लाभ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

माझी लाडकी बहिन योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठीची वेतन योजना

What is the Exact Pay Scheme For Majhi Ladki Bahin Yojana 3rd installment : काही तांत्रिक अडचणीमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या काही महिलांच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात 29 सप्टेंबरला 4500 रुपये जमा होतील. जुलै-ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेल्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील. तर सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा लाभ 4500 रुपये जमा होईल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article