Aditi Tatkare Clarification Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria 2025 : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mazi Ladki Bahin Yojana) योजनेची चर्चा सध्या जोमात आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर महिलांच्या कुटुंबातील सदस्यांनी कर भरला असेल, महिला सरकारी नोकरी करत असतील किंवा त्यांच्याकडे कार अथवा दुचाकी असेल, तर त्यांचा अर्ज बाद होईल.
आदिती तटकरे म्हणाल्या, “आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत, त्यानुसार लाडकी बहीण योजनेसाठीचे अनेक अर्ज अयोग्य ठरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.” यामध्ये पतीची सरकारी नोकरी, आधार कार्डमधील चुकीचा नंबर, किंवा स्थानांतरण यासारख्या बाबींचा समावेश आहे.
कोणते अर्ज होणार बाद?
‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष असणार आहेत. योजनेचा लाभ त्या महिलांना मिळेल, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. याशिवाय, सरकारी नोकरी असलेल्या महिलांना, पेन्शन मिळत असलेल्या महिलांना, तसेच कुटुंबातील सदस्य माजी आमदार किंवा खासदार असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
आदिती तटकरे यांनी पुढे सांगितले की, “महिलांनी अर्जात योग्य माहिती दिली आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल आणि तक्रारी आलेल्या अर्जाची सध्या छाननी करण्यात येईल.”
लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि निकष:
- आधार कार्ड व इतर माहिती: आधार कार्ड व अर्जतील माहितीमध्ये कोणताही फरक असू नये.
- उत्पन्न: कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांहून कमी असावे.
- सरकारी नोकरी किंवा पेन्शन: सरकारी नोकरी किंवा पेन्शन असलेल्या महिला योजनेसाठी पात्रता नाही.
- कार किंवा दुचाकी: अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांकडे कार किंवा महिलेच्या नावावर दुचाकी असल्यास अशा महिलांचे अर्ज नाकारले जातील.
- आंतरराज्यात स्थलांतर: आंतरराज्यात स्थलांतर केलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जातील.
लाडकी बहीण योजना (Mazii Ladki Bahin Yojana) अधिक पारदर्शक आणि सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत विचार केला जाईल अस आदिती तटकरे म्हणाल्या.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे, परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही निकषांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.