पुढच्या हफ्त्याची काळजी करू नका – अदिती तटकरे Majhi Ladki Bahin Yojana Fourth Installment

2 Min Read
Aditi Tatkare Majhi Ladki Bahin Yojana Fourth Installment Update

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News: महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या आमच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक अपप्रचार करत आहेत. पण जरी विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तरी आमच्या सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा हफ्ता बंद होऊ देणार नाही. (Aditi Tatkare promises that even in opposition, the government will continue Majhi Ladki Bahin Yojana’s installments. Latest update on the fourth installment here).

Majhi Ladki Bahin Yojana Fourth Installment: लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. आमच्या विशेष प्रतिनिधी वार्ताहराने महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याशी नुकतेच फोन संवाद साधला. त्यादरम्यान अदिती तटकरे म्हणाल्या. आमच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व भगिनींच्या बँक खात्यात लवकरच योजनेचे पैसे जमा होतील. जुलै आणी ऑगस्ट महिन्यात काही तांत्रित अडचणींमुळे ज्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नव्हते त्यांच्याही खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. लवकरच पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर सर्व डाटा मीळेल.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधक आमच्या सरकारने सुरु केलेल्या योजनांवर टीका करत आहेत. विरोधकांकडून समाजात खोटी माहिती पसरवली जात आहे. पण ‘अजित दादा’ पवारांनी यापूर्वीच सांगितल्या प्रमाणे विरोधकांच्या टिकेकडे लक्ष न देता आम्ही आमचे काम करणार आहोत. आणी लाडकी बहीण योजनेबाबत सांगायचं झालं तर, आमच्यावर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तरी आम्ही लाडकी बहीण योजनेचा हफ्ता बंद होऊ देणार नाही. लाडकी बहीण ही केवळ एक योजना नसून राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने आमच्या सरकारने टाकलेले एक पाऊल आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या.

दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article