आनंदाच्या शीध्यासोबत गणेशोत्सव होईल गोड, ‘या’ तारखेपर्यंतच मिळणार आनंदाचा शिधा Anandacha Shida Latest News

2 Min Read
Anandacha Shida Latest News Ganeshotsav 2024 Distribution

Anandacha Shida Latest News: लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा येत्या गणेशोत्सवाला दिला जाणार आहे.

Anandacha Shida 2024 : राज्यातील नागरिकांना गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा आनंदाचा शिधा येत्या गणेशोत्सवाला दिला जाणार आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून ५६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतो आहे. याबाबत राज्यातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी केला आहे.

आनंदाचा शिधा कधी मिळणार

१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे केवळ १०० रुपयांमध्ये सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. यामार्फत द्रारिद्य्ररेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

५६२.५१ कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च

आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी अंदाजे ५४३.२१ कोटी आणी त्यासाठीचा इतर खर्च १९.३ कोटी खर्च असा एकूण ५६२.५१ कोटी इतका प्रस्तावित खर्च करण्यास मान्यता मिळाली आहे.

आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी २१ दिवसांऐवजी ८ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

काय असेल आनंदाचा शिधा?

नागरिकांना यंदा एक किलो चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल असा आनंदाचा  शिधा देण्यात येणार आहे.

आनंदाचा शिधा कोणाला मिळणार?

राज्यातील अत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रकांना या आनंदाच्या शीध्याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर  व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील द्रारिद्य्र रेषेखालील केशरी रेशनकार्ड असणाऱ्यांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एकूण सुमारे 1,70,82,086 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now