माझी लाडकी बहिन योजनेसाठी मोबाईल वरुन फक्त 5 मिनिटात असा करा अर्ज, सगळ्यात सोपा पर्याय

4 Min Read
Apply For Majhi Ladki Bahin Yojana Using Mobile

How To Apply For Majhi Ladki Bahin Yojana Using Mobile?आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणार असाल तर येथे त्यासंबंधित सविस्तर माहिती दिली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आपण फक्त 5 मिनिटात आपल्या मोबाईवरून अर्ज करू शकता.

महाराष्ट्र सरकारने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. आणी लगेचच त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र लाडकी बही योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला सरकारकडून १५०० रुपये मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणी त्यामुळेच माझी लडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायला महिलांच्या मोठ्या रांगा लागत आहे. पण हा त्रास सहन ना करता आपण घरबसल्या मोबाईवरून अगदी सोप्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता. कसा ते जाणून घ्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहे पात्रता?

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे. त्यासाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असायला हवे.

🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना पात्रता जाणून घ्या.

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला.
  • पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.
  • बँक पासबूक.
  • मोबाईल क्रमांक.
  • उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड .
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म.

🔴 नवीन सगळ्यात सोपा मार्ग वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana App Maharashtra: ॲप वरून फक्त 10 स्टेपमध्ये असा भरा अर्ज.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईलवरून अर्ज कसा करायचा?

How To Apply For Ladki Bahin Yojana On Mobile: माझी लडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया जाणून घ्या. खाली सांगितलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा आणी फक्त 5च मिनिटात अर्ज करा:

१) गुगल प्ले-स्टोअरवरून ‘नारीशक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करा. आणी ज्या महिलेच्या नावे अर्ज भरायचा आहे, त्या महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून ॲपमध्ये लॉगीन करा.

२) नंतर ‘Accept Term and Condition’ वर क्लिक करा आणि स्वीकारा या पर्यायावर क्लिक करा.

३) ज्या मोबाईल क्रमांकाने तुम्ही लॉगीन केले असेल त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये टाकून ‘व्हेरिफाय ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा.

४) नंतर ‘तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा’ असा संदेश दिसेल. तिथे ‘आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा’, या पर्यायावर क्लिक करा.

५) प्रोफाईल अपडेट करण्यासाठी, तुमचे संपूर्ण नाव, ईमेल आयडी (असेल तर), जिल्हा, तालुका, नारीशक्तीचा प्रकार अपडेट करा.

६) आपली प्रोफाईल अपडेट केल्यानंतर खाली ‘नारीशक्ती दूत’ या पर्यायावर क्लिक करा.

७) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पर्यायावर क्लिक करा.

८) आधार कार्डप्रमाणे महिलेचे संपू्र्ण नाव, पतीचे किंवा वडिलांचे नाव, जन्म तारीख, जन्माचे ठिकाण (गाव/ शहर) पीन कोड, संपूर्ण पत्ता, अर्जदार महिलेचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहे का?, वैवाहिक स्थिती व बॅंक खात्यची माहिती भरा.

९) सर्व माहिती भरल्यानंतर आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखल/रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, (डाऊनलोड करून प्रिंट काढून त्यावर सही करा आणि मग ते अपलोड करा) व बॅंकेच्या पासबूकच्या फोटो आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा, आणि खाली असलेल्या ‘जतन करा’. पर्यायावर क्लिक करा.

१०) आपली माहिती बरोबर आहे की नाही तपासा आणि ‘अर्ज दाखल करा’, या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी भरून अर्ज दाखल करा.

११) आपण केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करून केव्हाही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

🔴 फॉर्म डाउनलोड करा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म डाऊनलोड करा, Majhi Ladli Bahin Yojana Form Download.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now