अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती? येथे जाणून घ्या Atal Pension Yojana

2 Min Read
Atal Pension Yojana Application Process Documents

Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजना: आपल्या देशात अशा अनेक योजना चालू आहेत ज्याद्वारे लोकांना मोठ्या प्रमाणात लाभ दिला जात आहे. तुम्ही ग्रामीण भागात राहात असा किंवा शहरी भागात. तुम्ही एखाद्या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही त्या योजनेसाठी अर्ज करून त्या योजनेचा लाभ घेऊ शकता.  सरकारही विविध प्रकारची प्रसिद्धी करून लोकांना योजनांशी जोडण्याचे काम करत असते. प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना नावाची एक योजना आहे ज्या अंतर्गत तुम्हाला पेन्शन मिळते. तुम्हालाही पेन्शन मिळवायची असेल तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता. या योजनेत सामील होऊन तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते जाणून घ्या…

अटल पेन्शन योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत

तुम्ही अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता तेव्हा काही कागदपत्रे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असते. यामध्ये:

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पॅन कार्ड 

जर ही कागदपत्रे अपडेट केलेली नसतील तर तुम्हाला ती अपडेट करून घ्यावी लागतील.

अटल पेन्शन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम दर महिन्याला गुंतवणूक करावी लागते आणि नंतर 60 वर्षांनंतर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. या योजनेसाठी १८ ते ४० वयोगटातील लोक अर्ज करू शकतात.

जर तुमचे वय 18 वर्षे असेल, तर तुम्हाला या योजनेत दरमहा फक्त 210 रुपये गुंतवावे लागतील त्यानंतर वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मीळेल.

अशा प्रकारे तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता

तुम्हालाही अटल पेन्शन योजनेंतर्गत वृद्धापकाळात दरमहा पेन्शन मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. तुम्ही येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटून अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे माहिती मिळेल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article