Aadhaar Fraud UIDAI Advice : आपल्याकडे अनेक प्रकारची कागदपत्रे असतात त्यातील काही कागदपत्रांची गरज खूप कमी असते तर काही कागदपत्रे अतिशय महत्वाची असतात. आणी त्यांची गरज प्रत्येक कामी पडतेच. यामध्ये आपले रेशनकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणी आधार कार्ड यांचा समावेश आहे. सध्या जवळपास प्रत्येकाकडे आधार कार्ड असतेच. आणी याच आधार कार्ड माहितीचा वापर करून आधारद्वारे फसवणूक होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळेच तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही आधारच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू शकता. हे टाळण्यासाठी UIDAI ने आधार कार्डधारकांना एक सल्ला दिला आहे. त्याबद्दल जाणून घेण प्रत्येक आधार कार्ड धारकासाठी खूप महत्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही आधारद्वारे होणारी फसवणूक कशी टाळू शकता UIDAI ने आधारद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय सल्ला दिला आहे ते…
Aadhaar Fraud News: तुमच्याकडेही आधार कार्ड असेलच, UIDAI ने आधारद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी असा सल्ला दिला आहे की, प्रत्येक आधार कार्ड धारकांनी त्यांचा अद्यवत मोबाईल नंबर त्यांच्या आधारशी लिंक केला असला पाहिजे. हे तुम्हाला ऑनलाईन फसवणूक होण्यापासून वाचवण्यास मदत करेल.
अनेक जण काही कारणास्तव त्यांचा मोबाईल क्रमांक बदलतात जो त्यांच्या आधारशी लिंक केलेला असतो आणी ते नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करण्याचे विसरतात. तुमच्या आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल क्रमांक तुमच्याकडे नसणे खूप धोक्याचे आहे. या एका छोट्याश्या चुकीमुळे तुमची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. तुमचे आधारशी लिंक असणारे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते. (Avoid Aadhaar fraud by following UIDAI’s advice. Learn how to update your mobile number linked to your Aadhaar card to stay safe from online scams and unauthorised transactions).
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधारशी कोणता मोबाईल नंबर अपडेट आहे ते तपासू शकता
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मोबाईल नंबर अपडेट केलेला नाही किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही असं तपासू शकता.
- 1: सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट च्या myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile या पेजवर जा.
- 2: येथे तुम्हाला ‘व्हेरिफाय मोबाईल नंबर’ आणी ‘व्हेरिफाय ईमेल एड्रेस’ हे दोन पर्याय दिसतील.
- 3: मोबाइल नंबर तपासण्यासाठी पहिल्या पर्यायावर क्लिक करा.
- 4: तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका
- 5: कॅप्चा कोड भरा आणि नंतर ‘ओटीपी पाठवा’ या पर्यायावर क्लिक करा.
- 6: जर तुम्ही टाकलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येत असेल तर याचा अर्थ तुमचा नंबर आधारशी लिंक आहे आणि आधारशी संबंधित सर्व OTP तुमच्या नंबरवर येतील.
अशा प्रकारे तुम्ही आधारद्वारे होणारी फसवणूक टाळू शकता.