डिसेंबरपासून बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रूपये – देवेंद्र फडणवीस Bandhkam Kamgar Yojana News

2 Min Read
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra News 2024

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra : बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत कामगारांना 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते ते वाढवून आता 1 लाख रूपये करण्यात आले आहे. डिसेंबरपासून बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत 1 लाख रूपये मिळतील. (Bandhkam Kamgar Yojana Maharashtra: Construction workers in Maharashtra will receive financial aid of Rs. 1 lakh under the Atal Bandhkam Kamgar Awas Yojana starting from December, as announced by Deputy Chief Minister Devendra Fadnavis).

बांधकाम कामगार मंडळ बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवते. यतीलच एक योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना (Atal Bandhkam Kamgar Awas Yojana). या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते त्यात वाढ करून बांधकाम कामगारांना अजूनही काही नवीन सुविधा देण्यात येणार आहेत.

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतंर्गत राहायला स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. आता या रकमेत वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रूपये करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

डिसेंबरपासून बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेतंर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जागा खरेदीसाठी 1 लाख रूपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 सध्या, माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज कसा व कुठे करावा?.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now