How To Buy Indian Flag From Indian Post | भारतीय पोस्टमधून भारतीय ध्वज कसा खरेदी करायचा: आपण येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त लोक देशभक्तीच्या रंगात रंगले आहेत. 28 जुलै 2024 रोजी मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याची विनंती केली आहे. जर तुम्हालाही स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमच्या घकरावर आपल्याला देशाची शान असलेला तिरंगा फडकवायचा असेल तर, भारतीय पोस्ट ऑफिस तिरंगा 3.0 अंतर्गत घरपोच तिरंगा झेंडे विकत आहे. तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसमधून तिरंगा फक्त 25 रुपयांना ऑनलाईन खरेदी करू शकता. भारतीय पोस्टकडून फक्त 25 रुपयांमध्ये तिरंगा घरपोच मीळेल. (How to order indian flag in post office).
How to get a flag from the post office: तुम्हालाही भारतीय पोस्ट ऑफिसमधून तिरंगा खरेदी करायचा असेल तर येथे आम्ही तुम्हाला त्यासाठी काय प्रक्रिया आहे ते सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही भारतीय पोस्ट ऑफिसमधून ऑनलाइन तिरंगा ऑर्डर करू शकता.
पोस्ट ऑफिसमधून भारतीय ध्वज कसा मागवायचा
- 1: पोस्ट ऑफिसकडून भारतीय तिरंगा ध्वज मागवण्यासाठी तुम्हाला https://www.epostoffice.gov.in/ProductDetails/Guest_productDetails या पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. वेबसाइट उघडल्यानंतर, तुम्हाला मोबाईल नंबर वापरून लॉग इन करावे लागेल.
- 2: यानंतर तुम्हाला उत्पादनाखालील राष्ट्रीय ध्वज पर्याय निवडावा लागेल आणि तो तुमच्या कार्टमध्ये जोडावा लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला Buy Now च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- 3: त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरिफाय करावा लागेल. यानंतर, तुमचा पूर्ण पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला Proceed for Pay या पर्यायावर क्लिक करावे लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला २५ रुपये द्यावे लागतील.
अशा प्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिसकडून तिरंगा ऑनलाईन ऑर्डर करू शकता.