Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : कुणाचा बाप आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणी 3000 रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा हफ्ता देताना हात अकडता घेणार नाही – एकनाथ शिंदे. (CM Eknath Shinde assures Majhi Ladki Bahin Yojana will not stop despite opposition. He hints at increasing the current Rs 1500 installment. 2.22 crore women have received payments so far).
छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा पार पडला त्यादरम्यान अदिती तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्यांचे मिळून 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच आत्तापर्यंत राज्यातील एकूण 2 कोटी 22 लाख महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले असून लाभार्थी महिलांची संख्या लवकरच अडीच कोटी होईल अस अदिती तटकरे यांनी सांगितल.
माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : महायुती सरकारने सुरु केलेली माझी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांनी खूप प्रयत्न केले. ही योजना बंद पाडण्यासाठी विरोधक कोर्टात गेले पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. विरोधक काहीतर खोडा घालतील म्हणूनच आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचेही 1500 रुपये आमच्या बहिनींच्या खात्यात जमा केले आहेत.
आमच सरकार घेणार साकार नसून देणार सरकार आहे. कुणाचा बाप आला तरी माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना यापुढेही चालू राहील. या योजनेअंतर्गत सध्या लाडक्या बहिनींच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत पण ही रक्कम आम्ही वाढवणार आहोत. सध्याचा 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 3000 रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा हफ्ता देताना आमच सरकार हात अकडता घेणार नाही. अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.