2 वर्षांत घेतलेले 600 निर्णय माझी लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde On Majhi Ladaki Bahin Yojna

3 Min Read
Cm Eknath Shinde On Majhi Ladaki Bahin Yojana 2024

CM Eknath Shinde On Majhi Ladaki Bahin Yojana : मागच्या 2 वर्षांत आमच्या सरकारने घेतलेले 600 निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

Maharashtra News Today : आळंदी येथील कार्यक्रमात वारकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सगळ्यात आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मला वारकऱ्यांमध्ये येण्याच भाग्य लाभल, यापेक्षा दुसर पुण्य काहीच नाही. जरी मी मुख्यमंत्री असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमच स्थान नक्कीच मोठ आहे. राजकीय मंडळी ही तुमच्या समोर नतमस्तक होतात. कारण वारकरी ही एक फॅक्टरी आहे ज्यात समाज तयार केला जातो. म्हणूनच आनंद दिघे साहेब नेहमी मला वारकरी संप्रदाय समूहात घेऊन यायचे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde reveals that 600 decisions taken in the last 2 years were overshadowed by the Majhi Ladki Bahin Yojana. He addresses the public during a program at Alandi)…

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

Chief Minister Eknath Shinde taking darshan of Dnyaneshwar Maharaj Samadhi
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो: इंस्टाग्राम)

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मागील 2 वर्षात आम्ही 600 निर्णय घेतले पण त्यातील अनेक निर्णय माझी लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले. एसटी तिकीटात लाडक्या बहिणींना 50% सूट दिल्यामुळे आमच्या बहिणी भाऊजींना म्हणतात तुम्ही घरीच बसा, मी बाजार करून येते.

माझी लाडकी बहीण योजना जनतेची दिशाभूल करणारी असल्याची अफवा

आम्ही राज्यात ‘माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केल्यापासून विरोधी पक्ष आमच्यावर सतत टीका करत आहे, आमच्या सरकारने सुरु केलेल्या सरकारी योजना फसव्या असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत. विरोधकांनी पहिला अशी अफ़वा पसरवली की आमच्या सरकारने निवडणुकीपुरती ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली आहे. योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर ते म्हणाले योजनेचे पैसे देणार नाहीत. आमच्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा केल्यावर आता ते म्हणतायत 2-4 च हफ्ते देतील. “हा एकनाथ शिंदे आयुष्यात कधी खोट बोलला नाही, कुणाला कधी ही फसवणारा नाही”. असं मुख्यमंत्री म्हणाले.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी वर्षभराची तरतूद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, विरोधक काहीही बोलूदेत – माझी लाडकी बहिण योजनेसाठी वर्षभराची तरतूद केली आहे. त्यामुळेच आता आमच्या भगिनींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही, दर महिन्याला निश्चित रक्कम आमच्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. आणी त्यापुढचीही तरतूद आम्ही लवकरच करणार आहोत.

लाडकी बहिण योजनेबरोबरच ‘लेक लाडकी’, ‘लखपती योजना’, मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, एस. टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना अशा योजना सुरु केल्या आहेत.

मीही एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला गरिबी चांगलीच माहिती आहे. आमचं सरकार राज्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी यापुढेही अशाच नव-नवीन योजना राबवेल. असं मुख्यमंत्री म्हणाले.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article