Majhi Ladki Bahin Yojana News : माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 31 जुलैनंतर अर्ज मंजूर झालेल्या महिलांना लाभ मिळणार आहे. त्याचसोबत ज्या महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. अशातच मुखमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या देण्यात येणारी रक्कम वाढवली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत.
Maharashtra Latest News Marathi : महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच विरोधी पक्षाकडून सरकारने ‘लाडकी बहीण योजना मतं मिळवण्यासाठी सुरु केली आहे’, ‘फक्त निवडणुकीपुरती ही योजना सुरु केली आहे’, ‘2-4 हफ्ते देऊन ही योजना बंद पडेल’, अशा प्रकारच्या टीका केल्या जात आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीही ‘लाडकी बहीण योजना’ बंद पडणार नसून लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना सध्या देण्यात येणारा 1500 रुपयांचा हफ्ता वाढवला जाईल असं सांगितलं होत. अशातच आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या देण्यात येणारी रक्कम वाढवली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या सरकारने “माझी लाडकी बहीण योजना” केवळ मतं मिळवण्यासाठी सुरु केलेली नसून राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणावर विसंबून राहावं लागू नये. यासाठी आम्ही ही योजना सुरु केली आहे. आम्ही लाडकी बहीण ही योजना सुरु केल्यानं विरोधी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळंच ते आमच्या सरकारच कौतुक करण्याऐवजी ‘ही योजना बंद पडेल’ अशी चुकीची माहिती पसरवत आहेत. पहिला ते म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीसाठी सुरु केली आहे. पैसे देणार नाहीत. आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होताच म्हणतात ‘2-4 च हफ्ते देतील’, त्यामुळंच आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं तोंडानं उत्तर देण्यापेक्षा आमच्या कामानच देऊ.
सध्या महिलांना सरकारकडून महिन्याला फक्त १५०० रुपये दिले जात आहेत आणी आमच्या लक्षात आलंय की 1500 रुपयांची रक्कम महिलांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही. आमचं सरकार एव्हढ्यावरच थांबणार नाही. महायुती सरकारला कल्याणकारी योजनांसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे. भविष्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम ४ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. आत्ता विरोधी पक्ष सत्तेत असता तर भष्ट्राचारामुळं लोकांना ३ हजार रुपयांऐवजी फक्त ४०० रुपयेच देण्यात आले असते. आम्ही सुरु केलेली लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरती नसून महिलांना सक्षम बनवण्यासाठी आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.