महाराष्ट्रातील दिव्यांगांना मिळणार 12000 ते 36000 रुपये, धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेची व्याप्ती वाढवणार?

2 Min Read
Dharmaveer Anand Dighe Disability Financial Assistance Scheme Expansion

Dharmaveer Anand Dighe Disability Financial Assistance Scheme : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेद्वारे दर वर्षाला 12000 ते 36000 रुपये अर्थसाहाय्य देण्यात येत आहे.

दिव्यांगांना आर्थिक मदत देण्यासाठी महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जवळपास ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ या योजनेतंर्गत (Dharmaveer Anand Dighe Disability Financial Assistance Scheme) अर्थसहाय्य करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून सुरु असलेल्या योजनांच्या धडाक्यात शिंदे सरकार या योजनेची व्याप्ती वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

सन २०२४-२५ ते सन २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजनेच्या माध्यमातून दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे किंवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे गरजेचे आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवून महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

कुणाला मिळणार लाभ?

  • दृष्टी नसलेले
  • कर्णबधीर
  • अस्थिव्यंग
  • मनोविकलांग
  • इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व आलेल्या दिव्यांग व्यक्ती

महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे सामान्य जीवन इतरांच्या आधाराशिवाय जगता यावे, त्यांना वेळेवर औषधोपचार व आहार घेता यावा व व्यंगत्वामुळे अर्थार्जन आणि जीवनमान सुधारणांची संधी गमावल्यामुळे आलेले परावलंबित्व कमी व्हावे, यासाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ सुरू करण्यात येत आहे. सध्या या योजनेचा लाभ बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना होणार असून. बाकी जिल्ह्यांमध्ये ही योजना नेमकी कधी पासून सुरु करण्यात येईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

कुणाला किती लाभ मिळणार?

  • वय वर्ष १८ वरील ४० टक्के दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तींना दर महिन्याला एक हजार रुपये प्रमाणे दर सहा महिन्याचे एकत्रित 6000 रुपये म्हणजेच वार्षिक 12000 रुपये मिळतील.
  • ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना दर महिन्याला 3000 रुपये प्रमाणे दर सहा महिन्याला एकूण 18000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये मिळतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article