आधार कार्ड हरवले असेल तर वापरू शकता ई-आधार, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे e-Aadhaar Card Benefits

2 Min Read
E Aadhaar Card Benefits Download Process

e-Aadhaar Card : आपल्याकडे असणाऱ्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे, परंतु तुम्हाला ई-आधारबद्दल माहिती आहे का? नसल्यास येथे जाणून घ्या… (Learn about e-Aadhaar, its benefits, and the process to download it online. Replace your lost Aadhaar card easily with UIDAI’s valid electronic Aadhaar card).

e-Aadhaar Card Downloading Process in Marathi |  ई-आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया मराठीमध्ये: जर तुम्हाला विचारले की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? तर नक्कीच तुमचे उत्तर होय असेल कारण भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड आहे. आपल्याला प्रत्येक कामासाठी त्याची गरज असते म्हणूनच जर तुम्ही कोणतेही सरकारी किंवा गैर-सरकारी काम करून घेणार असाल तर तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता भासतेच. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, जर तुमचे आधार कार्ड हरवले किंवा तुम्हाला अर्जंट आवश्यकता असताना ते सापडत नसेल तर तुम्ही तुमचे काम तुमच्या ई-आधार कार्डने करू शकता? कदाचित नाही, ई-आधार काय आहे आणि तुम्ही ते कसे डाउनलोड करू शकता आणि त्याचे फायदे काय आहेत हे ते जाणून घेऊयात…

ई-आधार म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत

  • ई-आधार ही तुमच्या आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत आहे जी तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव करून ठेवू शकता.
  • त्याचा फायदा असा आहे की ते हरवण्याची किंवा खराब होण्याची भीती नाही. UIDAI नुसार, ई-आधार पूर्णपणे वैध आहे आणि प्रत्येक सरकारी किंवा गैर-सरकारी कामासाठी ई-आधार वैध मानले जाते.

याप्रमाणे तुम्ही ई-आधार कार्ड डाउनलोड करू शकता

  • तुम्हाला  ‘Aadhaar Number’ ‘Enrolment ID Number’ ‘Virtual ID Number’ हे तीन पर्याय दिसतील.
  • त्यातील ‘Aadhaar Number’ पर्यायावर क्लिक करा.
  • ‘Aadhaar Number’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर तेथे तुमचा आधार क्रमांक भरा.
  • त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल, तो एंटर करा.
  • यानंतर ‘Send Otp’ वर क्लिक करा.
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेल OTP भरा.
  • त्यानंतर ‘Verify and Download’ बटणावर क्लिक करा.
  • तुमचे ई-आधार कार्ड डाउनलोड होईल.

तुमचा पासवर्ड तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि तुमचे जन्मवर्ष असेल, उदाहरणार्थ, जर तुमचे नाव SAGAR असेल आणि जन्मतारीख 09.04.1986 असेल तर तुमचा पासवर्ड SAGA1986 हा असेल.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now