Aadhaar Card Free Update Online | मोफत सेवा: यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून होती, परंतु ती वाढवून 14 डिसेंबर करण्यात आली आहे. यादरम्यान तुम्ही तुमच आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. या तारखेच्या नंतर मात्र अपडेटसाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल. (Update your Aadhaar Card for free before December 14! Learn the step-by-step process to update your name, address, and date of birth online without any charges. Don’t miss this important deadline!).
आधार कार्ड अपडेट करणे का महत्त्वाचे आहे?
आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे, ज्याशिवाय सरकारी योजना (Sarkari Yojana), बँक खात्यांशी संबंधित प्रक्रिया किंवा कर्ज घेणे खूप अवघड होते. सरकारने सर्व नागरिकांना दर 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून तुमचा डेटा अचूक राहील आणि तुम्हाला आधारशी संबंधित सर्व सेवांचा लाभ सहज मिळेल.
UIDAI ची मोफत सेवा | Aadhaar Card Free Update Last Date:
UIDAI ने 14 डिसेंबरपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या तारखेपर्यंत आधार कार्ड ऑनलाइन अपडेटसाठी कोणतेही शुल्क नाही. मात्र, ऑफलाइन अपडेटसाठी आधार केंद्रांवर 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
फक्त 5 सोप्या स्टेप्समध्ये असे करा आधार कार्ड अपडेट
- UIDAI वेबसाइटला भेट द्या:
(https://myaadhaar.uidai.gov.in) या संकेतस्थळावर जा.
- लॉग इन करा:
आधार क्रमांक आणि ओटीपीच्या मदतीने लॉग इन करा.
- अपडेट विभाग निवडा:
My Aadhaar विभागातील “Update Your Aadhaar” पर्यायावर क्लिक करा.
- कागदपत्रे अपलोड करा:
‘Document Update’ वर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- प्रक्रिया पूर्ण करा:
सबमिट केल्यानंतर SRN नंबर मिळेल, ज्याद्वारे तुम्ही कधीही तुमच्या आधार अपडेटची स्थिती तपासू शकता.
महत्त्वाचे:
UIDAI च्या या मोफत सेवेचा लाभ घ्या आणि अंतिम मुदतीच्या आधी तुमचे आधार अपडेट करून घ्या. नाव, पत्ता, किंवा जन्मतारीख दुरुस्त करणे सोपे आणि जलद आहे. 14 डिसेंबरनंतर अपडेटसाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल, त्यामुळे वेळेत आधार अपडेटची प्रक्रिया पूर्ण करा.