Free LPG Cylinder On Diwali 2024: दिवाळीत मिळणार मोफत LPG सिलिंडर

2 Min Read
🔴 हेही वाचा🤞

Free LPG Cylinder On Diwali : दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलिंडर देणार आहे. गॅस सिलिंडरची संपूर्ण रक्कम ग्राहकांना रोखीने भरावी लागणार आहे. त्यानंतर चार दिवसात इंधन कंपन्यांकडून अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. (On the occasion of Diwali, the central government will provide a free LPG cylinder to beneficiaries under the Pradhan Mantri Ujjwala Yojana. Find out how to avail the benefit).

Free LPG Cylinder On Diwali : या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ आधार ऑथेंटिकेशन पूर्ण झाले असलेल्याच ग्राहकांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार ऑथेंटिकेट झाले असणे अनिवार्य आहे.

दोनदा मिळणार मोफत गॅस सिलिंडर

केंद्र सरकारने होळी आणि दिवाळी या दोन सणाला मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजना आखली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधून आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी लिंक असेल आणि ज्यांचे आधार ऑथेंटिकेट झाले असेल केवळ तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. ग्रामीण देशातील गरजू लोकांना मोफत एलपीजी सिलिंडर कनेक्शन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. आतापर्यंत देशात 10  कोटींहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now