2025 मध्ये ‘इतके’ रुपये तोळा होणार सोन, बँक ऑफ अमेरिकेचा चक्रावणारा अंदाज Gold Price Forecast 2025 In India

2 Min Read
Gold Price Forecast 2025 India

Gold Price Forecast 2025 In India In Indian Rupees: सध्या जर तुम्ही अल्प मुदतीसाठी सोन्यात गुंतवणूक करणार असाल, तर भविष्यात तुम्हाला त्यातून किती परतावा मिळू शकतो हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. 2025 मध्ये भारतात सोन्याची किंमत किती रुपयांपर्यंत वाढेल? त्याबाबत काय अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (2025 Gold price forecast in India: Bank of America predicts a potential rise in gold rates to Rs 90,000 per 10 grams. Learn what experts are saying about future gold investments in India).

2025 Gold Price Prediction In India In Rupees : जर अल्प मुदतीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर भविष्यात तुम्हाला त्यातून किती परतावा मिळू शकतो हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. गुंतवणूकीवरील परताव्याच्या बाबतीत सोने इतर सर्व गुंतवणूकिंपेक्षा नेहमीच सुरक्षित असल्याचे मानले जाते. शेअर बाजार (Share Market), क्रिपटोकरंसी (Cryptocurrency), किंवा मालमत्तेच्या किमती कितीही घसरल्या तरी सोन्याच्या किंमतीत खूप मोठा बदल होत नाही. यामुळेच अनेक वर्षांपासून (Gold Investment) सोने हा गुंतवणुकीसाठी अनेकांचा आवडता पर्याय आहे. सध्या सोन्याचा भाव 79,755 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे.

सोन्याच्या किमतीचा अंदाज २०२५ गोल्डमन सॅच | Gold Price Forecast 2025 Goldman Sachs

गोल्डमन सॅचचा अंदाज गोल्डमन सॅच (Goldman Sachs) ही जगातील सर्वांत मोठी आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. गोल्डमन सॅचची स्थापना १८६९ मध्ये झाली होती. याचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात आहे. बँक ऑफ अमेरिका व्यतिरिक्त गोल्डमन सॅचचाही सोन्यात तेजी येण्याचा अंदाज आहे. गोल्डमन सॅचचा अंदाज आहे की 2025 च्या सुरुवातीस सोन्याच्या किमती $2,700 प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात, तस झाल्यास भारतात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम रु 81,000 ईतकी होईल.

सोन्याच्या किमतीचा अंदाज 2025 बँक ऑफ अमेरिका

बँक ऑफ अमेरिकाच्या (Bank of America) धोरणकर्त्यांनी 2025 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,000$ प्रति औंसपर्यंत पोहोचू शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे. बँक ऑफ अमेरिकाच्या अंदाजानुसार सोन्याची किंमत वाढणार आहे. सोन्याची किंमत प्रति औंस 3,000$ वर गेली तर ‘भारतात 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 90,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते’.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now