Gold Price Diwali 2024: दिवाळीला सोन्याची किंमत किती असेल? तज्ञांच मत काय?

2 Min Read
Gold Price Forecast Diwali 2024 Expert Opinions

Gold Rate Diwali 2024: भारताची राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९,००० रुपयांच्या आसपास आहे. आणी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,२६० रुपये आहे. सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीमध्ये केलेली कपात आणि अन्य आंतरराष्ट्रीय कारणांमुळे सोन्याच्या किमती सोन्याच्या सर्वोच्च पातळी पेक्षा खूपच कमी झाल्या आहेत. आता दिवाळीपर्यंत सोने कुठे जाणार? (Gold Price Diwali 2024) सोन्याची किंमत दिवाळी 2024 मध्ये किती असेल?, असे प्रश्न बहुतांश ग्राहकांच्या मनात निर्माण झाले आहेत. चला तर तर मग जाणून घेऊयात सोन्याचा भाव दिवाळी 2024 ला किती रुपये असेल. (Gold price diwali 2024 in rupees).

Diwali 2024 Gold Rate : सध्या अनेक ग्राहकांच्या मनात असे बरेचसे प्रश्न आहेत की येत्या दिवाळीपर्यंत सोने किती रुपये होणार? दिवाळीला सोन्याचा दर किती असेल?, सोन्याचे भाव अजून कमी होतील की पुन्हा वाढतील?

Diwali 2024 Gold Prices: दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,००० रुपयांच्या आसपास आहे. अलीकडेच, सरकारने अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीमध्ये केलेली कपात आणि आंतरराष्ट्रीय कारणांमुळे सोन्याच्या किमती खूप खाली आल्या आहेत. 75,000 रुपयांच्या आसपास असलेले सोने घसरून थेट 69,000 रुपयांवर आले. सोन्याचा भाव एकदमच 6,500 रुपयांनी घसरला. त्यामुळे सध्या सोन्याची खरेदी करणारे आणी सोन्यात गुंतवणूक करणारे आत्ताच सोन्यात गुंतवणूक करावी की नाही या विचारात आहेत.

संपूर्ण भारतात दिवाळी हा सण (Diwali Festival) खूप उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीला खूप मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते त्यामुळे सोन्याच्या किंमती किंचितश्या वाढतीलच असे सर्वांनाच वाटत असते. पण सरकारचे धोरण, नैसर्गिक आपत्ती, अंतरराष्ट्रीय धोरण अशा अनेक कारणांचा सोन्याचा किंमतीवर प्रभाव पडत असल्याने सोन्याच्या किमतीचा अचूक अंदाज कुणी लावू शकत नाही. 

2024 दिवाळीत सोन्याचा भाव 82 हजार रुपये?

Gold Price Forecast Diwali 2024: ‘मनीकंट्रोल’ वर प्रसारित झालेल्या वृत्तानुसार, तज्ञांच्या मते, दिवाळी 2024 पर्यंत सोन्याची किंमत 82,800 रुपयांपर्यंत वाढू शकते पण, सोन्याची किंमत 82,800 च्या पुढे जाणे कठीण आहे. कारण ही सोन्याच्या किंमतीची प्रतिकार पातळी आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now