आजही उतरले सोन्या चांदीचे दर, दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीत घसरण का? येथे जाणून घ्या आजचा सोन्या चांदीचा भाव 26 ऑक्टोबर 2024 Gold Price Today

2 Min Read
Gold Price Today 26 October 2024

Gold Price Today 26 October 2024 | आज 26 ऑक्टोबर 2024 रोजी सोन्याचा भाव : ऐण सनासूदीच्या दिवसात सोने चांदीचे दर आसमंताला भिडले असून ते सर्वसामान्य माणसांच्या खरेदीच्या आवाक्याच्या बाहेर गेले होते. सोने हे 80 हजार पेक्षा जास्त चांदी ही जवळपास एक लाख रुपये पर्यंत गेली होती. पण आता पुन्हा एकदा ग्राहकांसाठी खुशखबर आली असून ती अशी की सोन्याने चांदीच्या दारात मोठी घसरण झाल्याचे आढळून येत आहे. याचे कारण असे समोर येत आहे की ज्वेलर्स आणि रिटेल विक्रेत्यांच्या मागणी मंदावले आहेत ज्याचे कारण की सोन्या-चांदीच्या दराने गाठलेला उच्चांक तो सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीकडे पाठ फिरवल्याची निर्देशनास आली आहे. (Gold prices dropped today, 26 October 2024, offering relief to buyers before Diwali. Discover the reasons behind this dip in gold and silver rates and today’s updated prices in India).

Gold Silver Rate Down in India : यावर्षी सप्टेंबर पासूनच गणेश चतुर्थी त्यानंतर दसरा व त्या पाटोपाठ दिवाळी या सणासुदींच्या दिवसांमुळे गेल्या दीड दोन महिन्यापासूनच सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. बजेट परवडत नसतानाही ग्राहकांनी तो खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण आता ग्राहकांनी त्याकडे पाठ करण्यास सुरुवात केली होती. वाढती मागणी कमी झाल्यामुळे आणि परदेशातील युद्धाचे वातावरण (इराण विरुद्ध इजराइल) त्यांच्यातील कलेश पाहता सोनाच्या दरांवर पुन्हा फरक पडला आहे. तर मग तुम्ही सुद्धा आत्ता सोनी चांदी खरेदीचा विचार करत असाल तर मग जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर.

हा शुक्रवार ग्राहकांसाठी खुशखबर घेऊन आला, नवी दिल्लीमध्ये सोन्याचे भाव 1150 रुपयांनी घसरून 80 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला, तसेच चांदी ही दोन हजार रुपयांनी घसरून 99 हजार रुपये प्रति किलो वर पोहोचली. मात्र गुरुवारी सोन्याचे भाव 81,600 प्रति 10 g व चांदी एक लाख एक हजार रुपये प्रति किलो अशी होती.

सोन्या-चांदीत घसरण का?

स्थानिक बाजारातील ज्वेलर्स आणि रिटेल विक्रेत्यांकडून मागणी कमी झाल्याने व परदेशातील बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाल्याची बातमी आहे. तसेच काही तज्ञांचे असे म्हणणे आहे की डिसेंबर पर्यंत सोन्याचा हा भाव आणखी तीन हजार रुपये कमी होऊ शकतो तसेच चांदीचा भाव आणखी चार हजार रुपये कमी होऊ शकतो.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article