Maharashtra politics Mahayuti Vs Maha Aghadi : महाराष्ट्रात आता सरकार कुणाचही बनल तरी दोन्ही परिस्थितीत लाडक्या बहिणींसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) आणी अन्य महिलांसाठी सुद्धा आता सोन्याचेच दिवस येणार आहेत. दोन्ही आघाड्यांनी राज्यातील महिलांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या योजनेच्या (Maharashtra Sarkari Yojana 2025) घोषणा केल्या आहेत. पण सरकार स्थापन झाल्यावर त्या पूर्ण करण्यासाठी आता दोन्ही आघाड्यांवर मोठा दबाव असणार आहे. सरकार कुणाचंही बनल तरी आता महाराष्ट्रात महिलांचीच हुकूमत असणार आहे. (Both alliances in Maharashtra pledge women’s welfare schemes. BJP promises Rs 2,100/month for sisters, while Congress aims for Rs 3,000. Women’s empowerment takes centre stage).
भाजपने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, तर तेच (काँग्रेस) महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना देण्यात येणारी ही रक्कम भाजपच्या 2100 रुपयांपेक्षा जास्त वाढवून महाराष्ट्रातील सर्वच महिलांना 3000 रुपये देण्यात येतील अस सांगितल आहे. भाजपने 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवून आशा-अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले आहे, तर (काँग्रेस) महाविकास आघाडीने महिलांना 500 रुपयांमध्ये प्रत्येक वर्षाला सहा सिलिंडर तर बसमध्ये महिलांना पूर्णपणे मोफत प्रवास देण्याची घोषणा केली आहे.
Golden Era For Women In Maharashtra Majhi Ladki Bahin Yojana Latest News : म्हणजेच दोन्ही आघाडीने महिलांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की पुरुषांपेक्षा महिला अधिक संख्येने मतदान करत आहेत आणि त्यांची मते अनेकदा निर्णायक ठरत आहेत. अशा परीस्थितीत यावेळीही विजयाची चावी महिलांच्याच हाती राहणार असल्याचे चित्र आहे.
भाजपने काय आश्वासन दिली आहेत?
- महाराष्ट्रात सरकार आल्यास लाडकी बहिन योजनेंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.
- शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत युतीची चर्चा आहे.
- भाजपने शेतकऱ्यांना (PM Kisan Yojana) देण्यात येणारी रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
- अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढवणार.
- भाजपने 2027 पर्यंत महाराष्ट्रात 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याची घोषणा केली आहे.
- भाजपने 25 लाख रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे.
- भाजपने 10 लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.
- महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आश्वासन दिले आहे.
- अक्षय योजनेंतर्गत गरिबांना मोफत जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे.
- व्यवसाय करण्यासाठी OBC, SC आणि ST साठी 15 लाख रुपयांपर्यंत कमी दरात कर्ज.
- महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मयोगिनी मेळा आयोजित केला जाईल.
- महिला बचत गटांना 10 लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदरात कर्ज दिले जाईल.
(काँग्रेस) महाविकास आघाडीने कोणते आश्वासन दिले आहे?
- महालक्षी योजनेतून महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार
- महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार
- 6 गॅस सिलिंडर प्रत्येकी 500 रुपयांत उपलब्ध करून देणार
- महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
- महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये 2 दिवसांची ऐच्छिक रजा देणार
- जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 1 मुलीला लाख रुपये देणार
- सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना 4 हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार
- शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देणार
- नियामित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत सूट देणार
- राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार
- एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसांत निकाल जाहीर करणार
- महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेणार
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी 2 हजार देणार
- 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे 100 युनिटपर्यंतचे वीजबील माफ करणार
- सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
- महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
- महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील याना भारतरत्न देण्याची मागणी करणार
- शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढवणार
- सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
- राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार