Ardhvel Kamachi Yojana : राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बाहीन योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आणी ती यशस्वीपने राबवली त्याअंतर्गत राज्यातील 2 कोटी 30 लाखांहून अधिक महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. सरकारने अर्ज करण्याची मुदत वाढवल्याने लवकरच लाभार्थी महिलांची संख्या अडीच कोटी पर्यंत जाईल, अशातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी सुरु करण्यात येत असलेल्या अर्धवेळ कामाच्या योजनेबाबत मोठा खुलासा केला आहे. (Maharashtra government to launch a part-time job scheme offering ₹11,000 salary for 4-hour work shifts, starting November 1, 2024. Minister Chandrakant Patil announced Tata Group’s involvement, ensuring free meals along with pay).
Government Scheme of Part Time Jobs For Women in Maharashtra : या नव्याने सुरु करण्यात येत असलेल्या अर्धवेळ कामाच्या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना 4 तासांचा पार्ट टाईम जॉब आणी 11 हजार रुपये पगार देणार आहे. याची सुरुवात टाटा कंपनी पासून होत आहे. 11000 पगारासोबत महिलांना एकवेळचे जेवण आणि नाष्टा देखील मोफत मिळणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या योजनेमुळे राज्यातील गरजू महिलांना मोठा फायदा होणार आहे.
महिला आणि कॉलेजच्या मुलींना चार तासांचे जॉब उपलब्ध झाले तर त्या घराची आणि कॉलेजची जबाबदारी जबाबदारी सांभाळून मिळणाऱ्या 11 हजारांमध्ये त्या घर चालवायलाही योगदान देऊ शकतील.
चंद्रकांत पाटील म्हणाले: दुर्दैवाने नुकताच त्यांच निधन झाल. अशा स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समूहाने मला पाहिली ऑफर दिल्यामुळे आता राज्यातील गरजू मुली आणि महिलांना 11000 रुपये पगाराची थेट टाटामध्ये अर्धवेळ कामाची नोकरी मिळणार आहे. माझी खात्री आहे की, यामध्ये हळूहळू टाटा सोबतच अजूनही नवीन कंपन्या जोडल्या जातील आणी ही योजना संपूर्ण देशभरात रुजेल. त्यातून अनेक नवीन जॉबही निर्माण होतील. चार तासांचे जॉब निर्माण झाल्यामुळे जास्तीत जास्त महिला काम करतील, फक्त चार तासांचे काम असल्याने त्या घरालाही न्याय देतील. 1 नोव्हेंबर पासून या अर्धवेळ कामाच्या योजनेचा शुभरंभ होत असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.