Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज Approved झाला नाही? मग करा हे काम

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Application Approval Tips

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळपास 1 कोटी 45 लाख 76 हजार महिलांनी अर्ज केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जंपैकी एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. समोर आलेल्या या आकडेवारी नुसार लाखो महिलांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे. या अर्ज बाद ठरलेल्या महिलांकडे एक शेवटची संधी आहे, ती काय ते जाणून घेऊयात…

Majhi Ladki Bahin Yojana News Today : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 45 लाख 76 हजार महिलांनी नोंदणी केलेली आहे. आणि त्यातील एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. म्हणजे या महिलांना पहिल्या हफ्त्याची रक्कम मिळणार हे नक्की. पण अशात योजनेसाठी एकूण नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र महिलांचा आकडा या आकडेवारीत साधारण अंदाजे 11 लाखांच्या वर अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे. आणी या बाद ठरलेल्या महिलांकडे योजनेचा लाभ घेण्याची एक शेवटची संधी उरली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना अनेक महिलांनी हमीपत्र अपलोड केले नाही,आधारकार्डवरील फोटो दिसतच नसणे. आधार कार्डवर संपू्र्ण नाव नसणे. चुकीची कागदपत्रे अपलोड करणे, बँक खात्यासंबंधित माहिती व्यवस्थित न भरणे, हमीपत्र पूर्ण न भरता अपलोड करणे अशा अनेक चुका केल्या आहेत. तुमच्याकडूनही अर्ज करताना अशी एखादी चूक झाली असल्यास तुमचे अर्ज दुरूस्तीसाठी परत पाठवण्यात आले आहेत. अर्जात दुरूस्ती करून तुम्हाला अर्ज पुन्हा अपलोड करायचे आहेत. पण लक्षात घ्या की दुरुस्ती करण्याची तुमच्याकडे शेवटची संधी आहे. त्यामुळे आता अर्ज दुरुस्त करून परत अपलोड करताना सर्व माहिती बरोबर भरली असल्याची खात्री करून मगच अर्ज सबमीट करा. नाहीतर तुमची ही शेवटची संधी सुद्धा वाया जाईल.  

एकदा तुम्ही अर्जात दुरुस्ती करून अर्ज पुन्हा सबमीट केल्यावर तुमच्या अर्जाचे स्टेटस तुम्ही (Nari Shakti Doot app) नारीशक्ती दूत ॲप वर पाहू शकता. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप मधील केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुम्ही केलेले अर्ज दिसतील. तुम्हाला ज्या अर्जाचे स्टेटस बघायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. तुम्हाला त्या अर्जाची सद्य-स्थिति समजेल.

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana यशस्वी! 10 हजार रुपये किमतीचा भांडी सेट? कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या.

स्टेटसमधील हे पर्याय काय आहेत?

  • Approved

जर तुम्हाला अर्जात Approved स्टेटस दिसत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमीट झाला आहे. आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. 

  • Pending for Approval 

जर तुम्हाला अर्जात Pending for Approval हा पर्यंत दिसत असेल तर तुमचा अर्ज अजून तपासला गेला नाही. प्रतीक्षा करा तुमचा अर्ज तपासल्यानंतर स्टेटस चेंज होईल.

  • Edit and Resubmit

जर तुम्हाला अर्जात Edit and Resubmit पर्याय दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जातील चुका दुरुस्त करून अर्ज परत सबमीट करावा लागणार आहे.

  • Reject

जर तुम्हाला अर्जात Reject पर्याय दिसत असेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात आला आहे. आणी कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज रीजेक्ट करण्यात आलेला आहे याची माहिती तेथे दिलेली असेल.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now