सरकारने बंदी घालुनही चीनचा जीवघेणा विषारी लसूण बाजारात दाखल, Chinese Garlic News

2 Min Read
Illegal Chinese Garlic In India

China Garlic in India : चिनी लसूण आरोग्यासाठी खूपच हानिकारक असल्याने सरकारने त्यावर 2014 पासून भारतात बंदी घातली असली तरी देखील चिनी लसूण आता तस्करीच्या माध्यमातून बाजारात दाखल झाला आहे. हा लसूण आरोग्यासाठी खूप घातक असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली होती. कारण यात हानिकारक जीवघेण्या विषारी कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सरकारने चीन मधून आलेल्या लसूणावर बंदी घातली होती, पण भारतात उत्पादन होणाऱ्या लसणाच्या तुलनेत चिनी लसूण खूपच स्वस्त असल्याने तो बेकायदेशीरपणे तस्करी करून बाजारात आणला जात आहे आणी त्याची खुलेआम विक्री सुरु आहे.

भारतात बंदी असतानाही गुजरातमधील राजकोटमध्ये 30 पोती चायनीज लसूण आढळून आल्याने चिनी लसणाची भारतात विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. गोंडलच्या कृषी बाजार उत्पन्न समितीत हे लसूण सापडले, त्यानंतर तेथे मोठा गदारोळ झाला.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

बाजारात आलेल्या बेकायदेशीर चायनीज लसणाच्या पुरावाठ्या विरोधात 1 दिवसीय आंदोलन आयोजित केले. हा लसूण स्थानिक लसणापेक्षा खूपच स्वस्त असल्याने त्याची तस्करी केली जाते आणि भारतात उत्पादन झालेल्या लसणाच्या किंमती बरोबर त्याची विक्री करून चांगला नफा मिळवता येतो. मात्र हा लोकांच्या आरोग्याशी खेळलेला जीवघेणा खेळ आहे. व्यापाऱ्यांच्या निषेधानंतर, आता गुजरात सरकारने राज्यभरातील बाजारपेठांमध्ये चायनीज लसूण बेकायदेशीरपणे पुरवठा केला गेला आहे का हे तपासण्याचे आदेश दिले आहेत.

नेपाळमार्गे चायनीज लसणाची भारतात एंट्री

चायनीज लसणाची एंट्री नेपाळ सीमेवरून होत आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा लसूण उत्पादक देश आहे.  भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या चायनीज लसूणबाबत सूत्रांचे म्हणणे आहे की, जेव्हापासून स्थानिक लसूण महाग झाला आहे, तेव्हापासून चायनीज लसणाचा व्यवसाय वाढला आहे. घाऊक बाजारात चायनीज लसूण येण्याऐवजी तो छोट्या बाजारपेठेत आणि तेथून लोकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article