IMD Monsoon Forecast Today : हवामान विभागाकडून आज राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाकडून आज राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार:
- मुंबई: मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहील तर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
- कोकण: कोकणात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- विदर्भ: विदर्भामध्ये आज मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
- मराठवाडा: मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.
- मध्य महाराष्ट्र: मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, आज मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी असला तरी वादळी वारा आणि विजांचा कडकडाट याचे संकट असल्यामुळे हवामान विभागाकडून राज्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.