Gas Subsidy News Maharashtra : देशातील तीन प्रमुख गॅस कंपन्या – हिंदुस्तान गॅस, भारत गॅस आणि इंडेन गॅस – घरगुती गॅस उपभोक्त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्वाची मोहीम राबवत आहेत. यामध्ये गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, रेग्युलेटर आणि सुरक्षा पाइप्सची मोफत तपासणी केली जात आहे. यापूर्वी घरगुती गॅस उपभोक्त्यांना या तपासणीसाठी 50 रुपये द्यावे लागायचे. पण आता गॅस कंपन्या ही सेवा मोफत देत आहेत. (Gas companies offer free safety checks for household consumers. Failing to complete KYC may result in the loss of subsidies).
गॅस एजन्सी डीलर्स आणि गॅस डिलिव्हरीमन यांची जबाबदारी आहे की ते गॅस कनेक्शन असणाऱ्यांच्या घरी जाऊन गॅस शेगडी, गॅस सिलिंडर आणि पाइप्सची तपासणी करतील. आणि जर काही यातील काही खराब आढळले तर ते उपभोक्त्यांना तत्काळ बदलण्यासाठी सूचित करतील.
🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू, अनेक अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई.
KYC आणि सुरक्षा तपासणीचे महत्व
गॅस कंपन्या बायोमेट्रिक KYC प्रणालीद्वारे उपभोक्त्यांचा डेटा बनवत आहेत, ज्यामुळे त्यांना सर्व सुविधा मिळू शकतील. जर उपभोक्त्यांनी सुरक्षा तपासणी किंवा KYC केली नाही, तर त्यांना मिळत असणारी सबसिडी मिळणे बंद होऊ शकते.
Maharashtra Gas Cylinder News: गॅस एजन्सीने उपभोक्त्यांच्या मोफत सुरक्षा तपासणीसाठी विशेष टीम तयार कराव्यात आणी घराघरात जाऊन गॅस सिलिंडर, गॅस शेगडी आणि पाइप्सची तपासणी करावी आणी उपभोक्त्यांनी देखील या मोहीमेस सहकार्य करावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.