रेशन दुकान बनणार किराणा मालाच दुकान? अन्नपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची घोषणा! Jan Poshan Kendra Yojana

2 Min Read
Jan Poshan Kendra Yojana Ration Shops To Transform Into General Stores

Jan Poshan Kendra : सध्या रेशन कार्ड धारकांना सरकारकडून किमान दरात गहू- तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Jan Poshan Kendra Yojana : सध्या शासनाकडून रेशनकार्ड धारकांना मिळत असणाऱ्या वस्तूंच्या यादीत लवकरच भर पडणार आहे. अन्नपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. रेशनच्या दुकानांना  ‘जन पोषण केंद्र’ या संकल्पनेमध्ये रुपांतरित करण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एफपीएसची व्यवहार्यता आणि नागरिकांना पोषणयुक्त आहार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितल.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

रेशन दुकान बनणार किराणा मालाच दुकान?

केंद्र सरकारकडून सुरु करण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून रेशन दुकानधारकांना सरकारी अनुदानित अन्नधान्यांबरोबरच  त्यांच्या उत्पादनांमध्ये विविधता आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच आता रेशन दुकानांमध्ये बाजरी, विविध प्रकारच्या डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि किराणा मालाच्या दुकानाप्रमाणे दैनंदिन जीवनातील सामानाचीही विक्री केली जाणार आहे.

रेशन दुकानधारकांना सोन्याचे दिवस

या योजनेची अंमलबजावणी होताच रेशन दुकानामध्ये विक्रीसाठी असणाऱ्या मालामध्ये विविधता येईल. विविध प्रकारच्या डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि दैनंदिन जीवनातील सामान रेशन दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने रेशन दुकानधारकांना अर्थार्जनाचा नवा स्त्रोत उपलब्ध होईल. रेशन दुकानधारकांना करावा लागणार खर्च, जसे की दुकानाची जागा आणि मनुष्यबळाचा खर्च यावर उपाययोजना करण्याच्या हेतूने सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे.

देशात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरु करण्यात येत असून. सध्या गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा इथं ही योजना सुरु करण्यात येईल आणी त्यानंतर येत्या काळात या योजनेस मिळणारा प्रतिसाद पाहून त्यानंतर महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने (Jan Poshan Kendra Yojana) जन पोषण केंद्र योजनेची सुरुवात केली जाईल असे अन्नपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article