Kisan Vikas Patra Yojana 2024 : जर तुम्ही पैसे बचत करून त्यातून चांगला परतावा मिळवण्यासाठी एखादी चांगली योजना शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अतिशय चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या योजनेत गुंतवणूक करून काही महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट होतील. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव किसान विकास पत्र योजना असे आहे. ही योजना सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. लोक मोठ्या संख्येने या योजनेत पैसे गुंतवत आहेत.
किसान विकास पत्र योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला शेअर मार्केट (Share Market), म्युच्युअल फंड्स (Mutual Fund) या प्रमाणे कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही.
Post Office Scheme for Double Money | दुप्पट पैशासाठी पोस्ट ऑफिस योजना
किसान विकास पत्र योजना ही एकरकमी गुंतवणूक योजना आहे. म्हणजेच यामध्ये तुम्हाला एकदम पैसे गुंतवावे लागतात. किसान विकास पत्र योजनेतून सध्या 7.5% चक्रवाढ दराने व्याज मिळत आहे.
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्ही संयुक्त खाते आणि एकल खाते (Joint Account and Single Account) दोन्ही खाती उघडू शकता. या योजनेसाठी संयुक्त खाते तीन व्यक्तींसोबत उघडता येते.
तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 5 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर 7.5 टक्के दराने परतावा मिळेल. जर सध्याच्या 7.5 टक्के व्याज दराने बघितले तर तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 115 महिने लागतील. म्हणजे 115 महिन्यांनंतर तुम्हाला एकूण 10 लाख रुपये मिळतील.
पूर्वी किसान विकास पत्र योजनेतून पैसे दुप्पट होण्यासाठी 120 महिने लागत होते पण आता व्याजदरात वाढ झाल्यामुळे या योजनेतून पैसे दुप्पट होण्यासाठी कमी वेळ लागतो.