बचत गटातील महिलांसाठी ही सरकारी योजना ठरतेय खूपच फायदेशीर, येथे जाणून घ्या सर्व माहिती Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024

2 Min Read
Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024 Benefits Apply

Lakhpati Didi Yojana Maharashtra in Marathi | लखपती दीदी योजना 2024: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार आणी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी महिलांसाठी नव-नवीन सरकारी योजना (Government Schemes for Women) सुरु करून त्यांना आर्थिक लाभ, प्रशिक्षण, अनुदान ई. दिले जात आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला ज्यात त्यांनी लखपती दीदी योजनेचे फायदे सांगितले होते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच त्यांना उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. (Lakhpati Didi Yojana 2024 empowers Maharashtra’s SHG women with skill development and interest-free loans up to Rs 5 lakh. Learn how to apply and eligibility details)…

काय आहे लखपती दीदी योजना?

पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची (Lakhpati Didi Yojana) घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील 3 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय या योजनेअंतर्गत महिलांना 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते. यासोबतच, सरकार महिलांनी बनवलेल्या मालाला बाजारपेठेत पोहोचवून तो विकण्यास मदत करते. या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून आर्थिक आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला बचत गटाची सदस्य असणे आवश्यक आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता

  • या योजनेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
  • महिला भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटाची सदस्य असणे आवश्यक आहे.
  • लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात ही कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न दाखला
  • मोबाईल नंबर
  • आधारशी लिंक बँक खाते
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ईमेल आयडी

असा करा लखपती दीदी योजनेसाठी अर्ज

  • 1: लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बचत गटात सामील व्हावे लागेल.
  • 2: त्यानंतर तुमची व्यवसाय योजना तयार करावी लागेल.
  • 3: व्यवसाय योजना तयार झाल्यानंतर, बचत गटामार्फत अर्ज सरकारकडे पाठवावा लागेल.
  • 4: यानंतर सरकारकडून अर्जाची तपासणी केली जाईल.
  • 5: जर सर्व कागदपत्र आणी व्यवसाय योजना बरोबर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मीळेल.
  • 6: ईतर फायद्यांसोबतच या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देखील दिले जाते.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article