महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच महिलांना आता मिळणार प्रतिमाह 3000 रुपये – Mahalaxmi Yojana 2024 Maharashtra

3 Min Read
Mahalaxmi Yojana 2024 Maharashtra Women Benefit

Mahalaxmi Yojana 2024 Maharashtra : तर… महाराष्ट्रातील सरसकट महिलांना मिळणार प्रतिमाह 3000 रुपये, ही घोषणा ठरू शकते महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) साठी गेमचेंजर. (Mahalaxmi Yojana 2024 Maharashtra: Under this scheme, every woman in Maharashtra may receive Rs. 3000 monthly. Learn about eligibility and how this scheme could impact Maharashtra state politics).

Mahalakshmi Yojana Congress : महालक्ष्मी योजनेबद्दल (Mahalaxmi Yojana) जाणून घेण्याआधी सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै 2024 पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना सध्या दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. पण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही पात्रता निकष आहेत. ते खालील प्रमाणे:

लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला मिळतो

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा काही अटी आहेत.

नुकतच महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेला 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येईल अस आश्वासन देण्यात आल आहे.

अशातच आता (काँग्रेस) महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात एक महत्वकांक्षि घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) सुरु करून महाराष्ट्रातील सरसकट (सर्वच) महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. (काँग्रेस) महाविकास आघाडी कडून करण्यात आलेल्या या योजनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

🔴 हेही वाचा 👉 बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील 6000 रुपये; सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?.

गेल्या अनेक निवडणुकांमध्ये अस दिसून आल आहे की महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा अधिक संख्येने महिला मतदान करत आहेत आणि महिलांची मते अनेकदा निर्णायक ठरत आहेत. अशा परीस्थितीत, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील काही ठराविक महिलांनाच मिळत असल्याने (काँग्रेस) महाविकास आघाडी कडून घोषित करण्यात आलेली महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी साठी गेमचेंजर ठरू शकते.

🔴 हेही वाचा 👉 भारतातील ‘या’ राज्यात मीळत सर्वात स्वस्त सोन, यामागे चोरी हे देखील आहे एक कारण! Where Gold Is Cheap In India.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now