महालक्ष्मी योजनेसोबतच माहिलांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतील महाविकास आघाडीच्या या 5 घोषणा Mahalaxmi Yojana Maharashtra News

2 Min Read
Mahalaxmi Yojana Maharashtra MahaVikas Aghadi Announcements For Womens

Mahalaxmi Yojana Scheme Maharashtra : महालक्ष्मी योजना ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील एक महत्वकांक्षी योजना असली तरी महालक्ष्मी योजनेसोबतच मविआने माहिलांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतील अशा काही घोषणा केल्या आहेत त्या कोणत्या? जाणून घेऊयात… (Mahalaxmi Yojana and other Mahavikas Aghadi promises for women in Maharashtra, including free bus travel, financial support at 18, and affordable gas cylinders).

Congress Mahalaxmi Yojana : महालक्ष्मी योजना ही महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून घोषित केलेली एक महत्वकांक्षी योजना आहे. महाविकास आघाडीच्या घोषणेनुसार, महाराष्ट्रात (काँग्रेस) महाविकास आघाडीच सरकार बनल्यास: महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना (Mahalakshmi Yojana Maharashtra) सुरु करून महाराष्ट्रातील सरसकट महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपये दिले जातील. यासोबतच महाविकास आघाडीने माहिलांसाठी फायदेशीर ठरतील अशा अजून काही घोषणा केल्या त्या खालीलप्रमाणे.

महालक्ष्मी योजनेसोबतच माहिलांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतील महाविकास आघाडीच्या या घोषणा

  • 1: महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार.
  • 2: महाराष्ट्रातील महिलांचा बस प्रवास पूर्णपणे मोफत करणार.
  • 3: दर वर्षाला सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार.
  • 4: संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाची रक्कम दीडहजार वरून वाढवून दोन हजार रुपये करणार.
  • 5: महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha 2024 Election) प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा (Mahavikas Aghadi Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात प्रामुख्याने महिला, शेतकरी, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.

🔴 हेही वाचा 👉 नेमकी काय आहे महालक्ष्मी योजना? या योजनेची का होतेय सर्वत्र ईतकी चर्चा.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now