आंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेतील योगदानासाठीच मानधन कधी मिळणार? Maharashtra Anganwadi Sevika Dues Majhi Ladki Bahin Yojana Incentive

2 Min Read
Maharashtra Anganwadi Sevika Dues Majhi Ladki Bahin Yojana Incentive (Photo Credit: ANI)

Maharashtra Anganwadi Sevika Dues Majhi Ladki Bahin Yojana Incentive : महिला लाभार्थ्यांना दरमहा ₹१,५०० आर्थिक मदत देण्यात येणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ प्रभाविपणे (Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra) राबवणाऱ्या आंगणवाडी सेविकांना अद्याप त्यांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठीचे मानधन मिळालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्य सरकारने सुरू केलेली ही महत्वाकांक्षी योजना लागू करताना अंगणवाडी सेविकांना ₹५० प्रति ऑनलाइन अर्ज देण्याबाबत एक सरकारी निर्णय घेण्यात आला होता. मात्र आंगणवाडी सेविकांना अद्याप त्यांचे मानधन मिळालेली नाही. (Maharashtra Anganwadi workers await their dues for their crucial role in implementing the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana. Despite the overwhelming workload, workers are still uncertain about receiving promised compensation).

राज्यातील एकूण १,०८,५०७ आंगणवाडी सेविका आणि ७४,७४६ सहाय्यक कर्मचारी माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत होते. यामुळे अंगणवाडीतील रोजच्या कामाबरोबरच लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाचा भार आंगणवाडी सेविकांवर पडला. मुंबईच्या मंठकुर्द येथील आंगणवाडी सेविका संगीता कांबळे यांनी सांगितले की, त्यांच्या घराच्या बाहेर सरकाळी ७ वाजल्यापासून फॉर्म भरण्यासाठी महिलांची रांग लागलेली असायची, म्हणून त्यांना स्वतःचा मोबाइल फोन वापरून सकाळी सगळी काम सोडून अर्ज सबमिट कराव लागायच. परंतु पुढ काय होईल याबाबत त्या अनिश्चित आहेत.

राज्य सरकारने 2024 मध्ये जाहीर केलेल्या (Mazi Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’कडे आज राज्यातील करोडो महिलांचे लक्ष लागलेले असताना, योजनेच्या अंमलबजावणीत सहभागी झालेल्या आंगणवाडी सेविकांसाठी देय असलेल्या मानधनाबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मोबाईल अॅपच्या तांत्रिक अडचणींचा सामना करत डोर टू डोर अर्ज भरून प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी हजारो अर्ज सादर केले तरीही त्यातील अनेक अर्ज नाकारले गेले.

आंगणवाडी सेविकांना दिल्या जाणाऱ्या रकमेसाठी सरकार आता डेटा एकत्रित करत आहे. सध्या सरकारकडून २.४८ कोटी लाभार्थ्यांना ₹१,५०० वितरित करण्यात आले आहेत. महिला व बालविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी संगीतल की, १० लाख महिलांच्या खात्यात अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकले नाहीत कारण त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही.

राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या भरलेल्या अर्जाच्या संख्येची तपासणी सुरू केली असून, पुढील काही दिवसात आंगणवाडी सेविकांना त्यांच्या कष्टांचा मोबदला देण्यात येईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now