दिवाळी संपताच मविआने केली नवीन योजनांच्या घोषणांची आतिशबाजी महिलांना 3 हजार मुलींना 1 लाख अजून बरच काही… Mahavikas Aghadi Manifesto

3 Min Read
Mahavikas Aghadi Manifesto New Government schemes for women farmers youth healthcare maharashtra latest news

Marathi Sarkari Yojana News | Mahavikas Aghadi Manifesto : विधानसभा निवडणुक तोंडावर आली असून राज्यात 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आश्वासन देत आहेत. महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. मविआने त्यांच्या जाहीरनाम्यास ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव दिले आहे. (Mahavikas Aghadi Manifesto: New Government schemes for women, farmers, youth, and healthcare; monthly ₹3,000 for women, ₹1 lakh for girls, loan waivers for farmers, and more. Read detailed announcements ahead of Maharashtra Election).

MVA News Today: मविआने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात प्रामुख्याने महिला, मुली, शेतकरी, तरुण आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील योजना आणी घोषणा

Mahavikas Aghadi Manifesto
महालक्षी योजनेतून महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार
महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार
6 गॅस सिलिंडर प्रत्येकी 500 रुपयांत उपलब्ध करून देणार
महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये 2 दिवसांची ऐच्छिक रजा देणार
जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 1 मुलीला लाख रुपये देणार
सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना 4 हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार
शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देणार
नियामित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत सूट देणार
राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार
एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसांत निकाल जाहीर करणार
महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेणार
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी 2 हजार देणार
300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे 100 युनिटपर्यंतचे वीजबील माफ करणार
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील याना भारतरत्न देण्याची मागणी करणार
शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढवणार
सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार

🔴 हेही वाचा 👉 दिवाळी संपली, अजूनही जमा झाले नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे? अस चेक करा तुमच स्टेटस.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now