Majha Ladka Bhau Yojana: लाडकी बहिण योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली माझा लाडका भाऊ योजना काय आहे?

3 Min Read
Majha Ladka Bhau Yojana Maharashtra Update

Majha Ladka Bhau Yojana Maharashtra In Marathi : राज्यात लाडकी बहिण योजनेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणवर्गाकडून होणारी मागणी मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया (Majha Ladka Bhau Yojana) लाडक्या भावासाठीची योजना काय आहे?

Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारकडून नव्याने सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिला उत्सुक आहेत. लाडकी बहीण योजनेवरून विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. त्यातच लाडकी बहिण योजनेप्रमाणेच लाडका भाऊ योजना सुरु करावी असा टोला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. विरोधकांच्या त्या टीकेला चोख प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडका भाऊ योजना’ असे नाव दिले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू करणार असल्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे आणि या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील अल्प उत्पन्न असणाऱ्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत.

काय आहे माझा लाडका भाऊ योजना?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एक खास योजना जाहीर केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना जाहीर केल्या. या योजनांमध्ये तरुणांसाठीच्या नवीन योजनेचा समावेश आहे. ‘युवा अप्रेंटिसशीप योजना’ हे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 10 लाख सुशिक्षित तरुणांना 10 हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंड दिला जाणार आहे. ही तरुणांसाठी असलेली लाडका भाऊ योजना असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या घोषणा

  • राज्यात वीरशैव कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ, महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार.
  • चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिर यात्रा परिसर विकास आराखड्यासाठी 250 कोटी रुपये देणार.
  • मुंबई महापालिका सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास. सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यामध्ये वाढ करणार.
  • 15 वर्षांच्या आतील परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • पालघर येथे विमानतळ उभारणार.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now