Devendra Fadnavis On Majhi Ladki Bahin Yojana : राज्यसरकार कडून महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. सरकारकडून लवकरच एक मोठी घोषणा होऊ शकते. आणी सरकारच्या या नवीन घोषणेचा लाडक्या बहिणींना मोठा फायदा होऊ शकतो. (Maharashtra’s Majhi Ladki Bahin Yojana may soon expand, offering women monthly earnings of ₹10,000 under Lakhpati Didi Yojana, as announced by Devendra Fadnavis).
महिलांसाठी दरमहा 10 हजार रुपयांची योजना
Majhi Ladki Bahin Yojana Latest News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील प्रत्येक गरजू महिलेला लाभ घेता यावा यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात येणार असून, सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण लाडक्या बहिणींचे उत्पन्न दरमहा किमान 10 हजार रुपये असावे यासाठी केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या (Lakhpati Didi Yojana) लखपती दीदी योजनेची व्याप्ती वाढवून लखपती दीदी योजनेंतर्गत राज्यातील महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त कसे करता येईल यासंदर्भात उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून. लखपती दीदी योजनेत काही प्रमाणात बदल करून लवकरच महाराष्ट्रात ही योजना प्रभाविपने राबवली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही योजना खर तर भगिनींचे जीवन बदलण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक मोहीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 3 कोटी भगिनींना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक लाडक्या बहिणींना बचत गटांच्या माध्यमातून नवीन काम मिळवून देऊन त्यांचे मासिक उत्पन्न दरमहा 10,000 रुपये होईल अशी व्यवस्था करण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु आहे.
या योजनेचा अंतिम आराखडा तयार होताच राज्यात ही योजना सुरु करण्यात येईल आणी लवकरच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बचत गटांच्या माध्यमातून नवीन काम उपलब्ध होईल आणी त्यांना मासिक किमान दरमहा 10,000 रुपये उत्पन्न मीळेल.