Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today 2 January 2025: मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. एकीकडे महिलांना 1500 रुपये मिळाल्याने त्यांचे उत्साहवर्धन झाले आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारने योजनेसाठी अधिक निधीची तरतूद केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra’s ‘Majhi Ladki Bahin Yojana 2025’ starts disbursing December benefits to women. With increased financial pressure, the government announces cuts in various departments’ budgets, including energy and welfare sectors, to manage the scheme’s expenses.).
Majhi Ladki Bahin Yojana 2025 CM Devendra Fadnavis New Decision: माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana 2025) ही योजना आर्थिक दृष्ट्या सरकारच्या तिजोरीवर भार वाढवणारी ठरली असून, विरोधकांनी निवडणुकीपूर्वीच यावर अनेक तक्रारी मांडल्या होत्या. तसेच, योजनेच्या खर्चामुळे इतर सरकारी खर्चांवर ताण येऊ लागला आहे, ज्यामुळे शिक्षकांच्या पगारात उशीर होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून सरकारने शासकीय खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे.
नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात शासकीय खर्चात 55 टक्के कपात करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, ऊर्जा, समाजकल्याण, क्रीडा आणि इतर महत्त्वाच्या विभागांतील खर्चात कपात करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Majhi Ladki Bahin Yojana 2025) नवीन वर्षात अधिक निधी उभारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ही योजना महिलांसाठी फायदेशीर असली तरी सरकारला या योजनेमुळे आणखी कठोर आर्थिक धोरण लागू करावेळ लागणार आहे.