लाडकी बहीण योजनेचे 4500₹ जमा होण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत करुन घ्या ‘हे’ काम! Majhi Ladki Bahin Yojana

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 4500 Rs By August 31

Majhi Ladki Bahin Yojana Latest News Today : 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आले असून, 31 जुलै नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये जमा होणार आहेत. आत्तापर्यंत राज्यातील सुमारे दीड कोटी महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : १ जुलैपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील कोट्यावधी महिलांनी अर्ज केले. आलेले अर्ज तपासून त्यातील ज्या महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते त्या लाभार्थी महिलांच्या नावाची यादी बँकेकडे पाठवण्यात आली. त्यानुसार महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. आता 31 जुलै नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात सरकारकडून 4500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळेच यापूर्वी अर्ज मंजूर असूनही अनेक महिलांना बँकेत पैसे जमा होण्यात अनेक अडचणी आल्या. तुम्हाला त्या अडचणी येऊ नयेत यासाठी तुमच बँक खात आधार कार्डसोबत लिंक असल्याची खात्री करा. ज्या महिलांची एकापेक्षा जास्त्त बँकेत खाती असतील त्या महिलांनी त्यांच्या दोन्ही बँक खात्यास आधार लिंक करावे.

31 ऑगस्ट पर्यंत बँक आधार लिंक करून घ्या

लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैपासून मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच 1 ऑगस्टपासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टपासून 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळेच 31 ऑगस्ट पर्यंत बँक आधार लिंक करून घ्या म्हणजे तुमच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

31 ऑगस्ट नंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही मिळणार लाभ

सध्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. पण ज्या महिला काही कारणास्तव 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकत नाहीत त्यांनी 31 ऑगस्ट नंतर अर्ज केले तरी त्यांच्या खात्यात जुलै पासूनची रक्कम जमा केली जाईल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा हे सरकारचे धोरण आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now