Majhi Ladki Bahin Yojana 6th Installment Date: आत्तापर्यंत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण 5 हप्ते देण्यात आले आहेत. 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे हफ्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. (Find out when the 6th installment of Majhi Ladki Bahin Yojana will be credited. Maharashtra government plans to release ₹2100 to beneficiaries soon).
Majhi Ladki Bahin Yojana December Installment Date: केंद्र आणि राज्य सरकार देशातील महिलांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवत आहेत. या योजनांचा उद्देश देशातील महिलांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती.
या योजनेद्वारे, महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद केली होती. पण निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून या योजनेचा दरमहा 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. निवडणूक निकालानंतर निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले व महायुती कडून देण्यात आलेल आश्वासन पाळल जाणार असल्याची ग्वाही दिली.
निवडणूक पार पडली निकालही लागला, राज्यातील कोट्यवधी महिला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अनेक महिलांना हे जाणून घ्यायचे आहे की महाराष्ट्र सरकार माझी लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता कधी जारी करू शकते? या संदर्भात, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता कधीपर्यंत जारी करू शकते.
Majhi Ladki Bahin Yojana Latest News: मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या राज्यात सरकार स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. त्यामुळेच राज्यात नवीन सरकार स्थापन होताच, याच महिन्यात राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता जारी केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणी एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याच यापूर्वीच जाहीर केल होत.