लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे? Majhi Ladki Bahin Yojana New Gr

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Aditi Tatkare New Gr Update

Majhi Ladki Bahin Yojana New Gr : राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी आत्ता पर्यंत दीड कोटिहून अधिक महिला पात्र ठरल्या असून त्या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे राज्यातील महिलांना दिलासादायक बातमी दिली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करत. त्यांनी राज्य सरकारचा नवीन जीआर शेअर केला आहे.

31 ऑगस्ट ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले. अर्ज मंजूर करण्याची गतीही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली असल्याने जवळपास कोट्यवधि महिला ऑगस्ट महिन्यात पात्र ठरल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी नुकत्याच पात्र ठरलेल्या काही महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्यांचे म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पण, काही तांत्रिक अडचणींमुळे काही महिला अर्ज भरू शकल्या नाहीत. राज्यातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता यावा म्हणून राज्य सरकारने अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. सप्टेंबर महिन्यातही या योजनेसाठी अर्ज भरता येणार आहेत.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलंय, “महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार. योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.” यासोबतच आदिती तटकरे यांनी राज्य सरकारचा नवा जीआरही जोडला आहे.

“माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिलांना सप्टेंबर २०२४ मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील”, असे नवीन जीआरमध्ये नमूद करम्यात आले आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now