Mazi Ladki Bahin Yojana App Maharashtra: माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नारीशक्ती दूत ॲप वरून लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घ्या…
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana App: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज भरण्यासाठी शेवटची तारकीख 31 ऑगस्ट असल्याने योजनेचा अर्ज भरण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी होत आहे. तर काही ठिकाणी लवकरच अर्ज भरून देण्यासाठी महिलांकडून लाच घेण्याचे प्रकार देखील घडले आहेत. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारने एक अॅप देखील लाँच केल आहे. त्या मोबाईल अॅपचा वरून आपण घरबसल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करू शकता. अॅप वापरून अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ॲप वापरून अर्ज कसा भरायचा…? (how to apply for ladki bahin yojana in maharashtra online using nari shakti doot app)
🔴 हे वाचलं का? 👉 ‘माझी लाडकी बहिण’ नंतर महिन्याला 10,000 रुपये देणारी नवीन योजना: काय आहे ही योजना?.
नारी शक्ती दूत ॲप वापरून मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ते जाणून घ्या
नारी शक्ती दूत ॲप वापरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1:
- गुगल प्ले स्टोरमधून नारीशक्ती दूत अॅप डाऊनलोड करा (nari shakti doot app download). अॅप डाऊनलोड झाल्यावर ते ओपन करा. अॅप सुरू झाल्यावर तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रीनवर ‘नारीशक्ती दूत ह्या APP मध्ये आपले स्वागत आहे.’ असा मेसेज दिसेल.
स्टेप 2:
- तीन स्लाइड पुढे जाणून Done या बटणावर क्लिक करा. आणि नंतर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. ‘I Accept’ या बटणावर क्लिक करा. आणि लॉग इन या बटणावर क्लिक करा.
स्टेप 3:
- लॉग इन केल्यावर तुम्हाला या अॅपमध्ये तुमची प्रोफाइल बनवावी लागेल. ज्यामध्ये तुमचे पूर्ण नाव, इमेल-आयडी ही माहिती भरा. आणि तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. नंतर तुमची प्रोफाइल अपडेट करा आणि मग ‘योजना’ या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4:
- आता माझी लाडकी बहीण या योजनेचे हमीपत्र डाऊनलोड करा आणि मुख्य पेजवर जा. जिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 5:
- आता येथे महिलेचे नाव लिहा, त्यानंतर महिलेच्या वडील किंवा पतीचे नाव लिहा. नंतर तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडताना हे सुनिश्चित करा की अर्जदार महिलेचं वय हे 21 ते 65 या दरम्यान आहे.
स्टेप 6:
- त्यानंतर तुम्हाला पुढे जिल्हा, गाव/शहर हे निवडावे लागेल आणि तुमचे स्थानिक स्वराज्य संस्था जी असेल ती निवडा. पुढे पिनकोड आणि तुमचा पत्ता ही माहिती भरा. यासोबत मोबाइल नंबरही टाकावा लागेल.
स्टेप 7:
- आता तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याबाबत माहिती विचारली जाईल. मिळत असेल तर ‘हो’ या बटनावर क्लिक करा. नसेल मिळत तर ‘नाही’ वर क्लिक करा.
स्टेप 8:
- आता तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरा. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे पूर्ण नाव आहे ते तसेच लिहा आणि तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड भरा.
स्टेप 9:
- आता तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ज्यात तुम्हाला आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी पिवळे/केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करावी लागतील आणि अर्जदाराचा फोटो जोडावा लागेल.
स्टेप 10:
- आता ‘Accept हमीपत्र डिसक्लेमर’ या बॉक्समध्ये टीक करा. व ‘माहिती सादर करा’ या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लोकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या.