Ladki Bahin Yojana Hamipatra : अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे काय?, हमीपत्र कस भराव ते जाणून घ्या

4 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Arjdarache Hamipatra Mhanje Kay

Arjdarache Hamipatra Mhanje Kay : माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना एक हमीपत्र (Hamipatra) अपलोड करावे लागते. अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे काय? त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या… (ladki bahin yojana hamipatra meaning in marathi?)

(Hamipatra) हमीपत्र म्हणजेच सेल्फ सर्टीफिकेट. Arjdarache Hamipatra Mhanje Kay? अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे स्वयंघोषणापत्र म्हणजेच अर्ज करणारी व्यक्ती ती माहिती बरोबर (खरी) असल्याची हमी (खात्री) देत आहे. लाडकी बहीण योजना हमीपत्र यासाठीच भरून घेतले जात आहे. अर्जदार हमीपत्र सही करून अपलोड करतो म्हणजेच अर्जदारणे भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची अर्जदार स्वतः लेखी हमी देत आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

🔴 आजची मोठी बातमी 👉 Ladki Bahin Yojana यशस्वी! 10 हजार रुपये किमतीचा भांडी सेट? कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या.

माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात काय आहे?

Ladki Bahin Yojana Hamipatra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलेला एक हमीपत्र अपलोड करावे लागते. हे हमीपत्र म्हणजे एका प्रकारचे स्वयंघोषणापत्र आहे. या हमीपत्रावर तुम्हाला एकूण आठ स्वयंघोषणा करायच्या आहेत. हमीपत्रावर प्रत्येक घोषणेची (अट) सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. महिलांनी या स्वयंघोषणा व्यवस्थित वाचून डाव्या बाजूच्या चौकोनावर खून करायची आहे. आणि अर्जदार महिलेने खाली उजव्या कोपऱ्यात सही करायची आहे.

🔴 हमीपत्र डाउनलोड करा 👉 Majhi Ladki Bahin Yojana Arjdarache Hamipatra PDF Download: लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाऊनलोड करा.

माझी लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र कसं भरायचं?

Ladki Bahin Hamipatra : माझी लाडकी बहीण अर्जदाराच्या हमीपत्रात असणारे 10 मुद्दे वाचून ते बरोबर असतील म्हणजेच तुम्हाला लागू होत असतील तरच तुम्हाला त्याच्या समोर असलेल्या बॉक्समध्ये बरोबर अशी खूण करायची आहे.

1. माझ्या कुटुंबाचं एकत्रिक वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त नाही.

2. माझ्याकडं उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास मला पिवळं किंवा केशरी रेशनकार्ड आधारवर उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.

3. माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य आयकरदाता नाही. (आयकरदाता म्हणजे : इन्कम टॅक्स भरणारा).

4. मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियम/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.

5. मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार/ कंत्राची कर्मचारी असून माझं उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा कमी आहे.

6. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.

7. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार नाही.

8. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत.

9. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.

10. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.

हमीपत्रात असणारे 10 मुद्दे वाचून तुम्हाला त्याच्या समोर असलेल्या बॉक्समध्ये बरोबर अशी खूण करायची आहे. आणी त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव लिहून सही करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारीशक्ती दूत अॅप मधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे.

🔴 हे वाचलं का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana: हमीपत्रातील चौथ्या अटीमुळे ठरतायत अर्ज अपात्र, जाणून घ्या नेमकी काय आहे चौथी अट.

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?

अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर जमा केला जाणार आहे. 19 ऑगस्ट 2024 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे एकत्र 3000 रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत.

🔴 ट्रेंडिंग 👉 Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे काय? येथे जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article