Majhi Ladki Bahin Yojana Arjdarache Hamipatra PDF: लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाऊनलोड करा

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Arjdarache Hamipatra PDF Download

Majhi Ladki Bahin Yojana Arjdarache Hamipatra PDF Download : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ‘हमीपत्र’ हे सर्वात महत्त्वाचे आहे. या फॉर्मचा पीडीएफ कसा डाऊनलोड करायचा ते जाणून घ्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र कस डाऊनलोड करायच?

Mazi Ladki Bahin Yojana Arjdarache Hamipatra Download : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अल्प उत्पन्न असणाऱ्या वर्गातील महिलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये सुरू केलेली योजना आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हमीपात्र’ नावाचा एक विशेष फॉर्म भरावा लागतो. लाडकी बहीण योजना हमीपत्र फॉर्म कसा डाउनलोड करायचा, हमीपात्र पीडीएफ कसा भरायचा आणि यशस्वीरित्या कसा सबमिट करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या…

अस भरा माझी लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र पीडीएफ

लाडकी बहीण योजना हमीपत्र पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला ते काळजीपूर्वक भराव लागेल. त्यात तुमची वैयक्तिक माहिती – तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क आणि आधार क्रमांक टाका.

  • उत्पन्न घोषणा: येथे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नाही असे घोषित करा.
  • रोजगार स्थिती – कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी विभागांमध्ये नियमित/कायम कर्मचारी नाही याची पुष्टी करा.
  • योजनेतील सहभाग – तुम्ही रु. 1500 पेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही अन्य आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही हे सांगा.
  • जमीन आणि वाहन मालकी – तुमच्या कुटुंबाची जमीन आणि वाहन नोंदणी स्थिती घोषित करा.
  • आधार प्रमाणीकरण – आधार क्रमांक वापरून तुमची ओळख प्रमाणित करण्यास सहमती द्या.

लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?

अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर जमा केला जाणार आहे. 19 ऑगस्ट 2024 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे एकत्र 3000 रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now