लाडक्या बहिणींना दिवाळी गिफ्ट! ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे या तारखेला एकत्र जमा होणार Majhi Ladki Bahin Yojana Diwali Installment Ajit Pawar Announcement

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Diwali Installment Ajit Pawar Announcement

Majhi Ladki Bahin Yojana 4th Installment Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्यातील चौथ्या हफ्त्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. (Ajit Pawar announced that eligible women under Majhi Ladki Bahin Yojana will receive Rs 3000 for October and November installments together in their bank accounts by October 10).

राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरता महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात नुकताच तिसरा हफ्ता जमा करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यात जुलै-ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले होते त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या हफ्त्याचे 1500 रुपये, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन अर्ज केला होता आणी त्यातील ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला होता त्यांच्या खात्यात 1500 रुपये, तसेच ज्या महिलांचे अर्ज जुलै-ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते पण त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट आणी सप्टेंबर महिन्याचे 4500 रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अजूनही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आजपासून शासनाकडून विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. आणी लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

Majhi Ladki Bahin Yojana October Installment Date : परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हफ्त्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.

Majhi Ladki Bahin Yojana Fourth Installment Date
Majhi Ladki Bahin Yojana Fourth Installment Date

29 ऑक्टोबर पासून दिवाळी सूरू होत असल्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोनी महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबरपर्यंत जमा करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेदरम्यान केली.

त्यामुळेच आता लाडकी बहीण योजेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात येत्या आठच दिवसात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर दोनीही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article