मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना पात्रता जाणून घ्या, Majhi Ladki Bahin Yojana Eligibility

3 Min Read
Maharashtra Majhi Ladki Bahin Yojana Eligibility 2024

Majhi Ladki Bahin Yojana Eligibility: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करायला महिलांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. शासनाने या योजनेतील गुंतागुंत दूर करण्यासाठी काही अटी शिथिल केल्या आहेत त्यामुळे आता अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी झाली आहे. कुणीही घरबसल्या सोप्या पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकेल. पण अशा काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे देखील अर्ज करण्याआधी जाणून घेणे गरजेचे आहे. कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नही ते जाणून घ्या…

Mazi Ladki Bahan Yojana Maharashtra: महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ अंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. माझी लाडकी बहिण योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असणार आहे. सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून अनेक ठिकाणी शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ही नवीन ‘लाडली बहिण योजना’ लागू झाल्यापासून या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, निराधार महिला यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यांना मिळणार लाभ (ladki bahin eligibility in marathi)

ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स, स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील.

ज्या कुटुंबांकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात.

🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एका घरातील किती महिलांना मिळणार लाभ, योजनेत झालेला बदल जाणून घ्या.

माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यापूर्वी हे जाणून घ्या 

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना घाई करू नये. सरकारच्या नवीन निर्णयांमुळे ही योजना आता अतिशय सोपी बनली आहे. सरकारने योजनेत केलेल्या नवीन बदलामुळे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची आता गरज भासणार नाही. पण लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे 15 वर्षे जुने रेशन कार्ड असायलाच हवे. त्याचबरोबर, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. अधिवास प्रमाणपत्र असणे आता आवश्यकता नाही. इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाईल. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. तसेच 8 जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याद्वारे महिलांना महाराष्ट्र लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करता येईल. कोणत्याही व्यक्तीच्या मध्यस्थीची मदत घेऊ नये आणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नयेत असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now