Majhi Ladki Bahin Yojana Eligibility Check 2025: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” (Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेसंदर्भात मोठ्या घडामोडी घडत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरु झाली असून लवकरच काही महिलांची नावे योजनेच्या लाभार्थींच्या यादीतून (Majhi Ladki Bahin Yojana Yadi 2025) वगळाली जाणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. (Maharashtra’s Majhi Ladki Bahin Yojana faces scrutiny as ineligible women may be removed. Aditi Tatkare explains eligibility rules and the government’s move to check applications).
अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, जर कोणत्याही लाभार्थी महिलेला अपात्र ठरवले जाईल, तर तिच्या अपात्र ठरण्यामागचे निश्चित कारण देखील जाहीर केले जाईल. वेबसाईत किंवा अँपवर लॉगिन करून महिला त्यांच्या अपात्र ठरण्यामागचे कारण जाणून घेऊ शकतील.
पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना अयोग्य घोषित केले जाईल. माझी लाडकी बहीण योजनेसाठीची (Mazi Ladki Bahin Yojana) पात्रता तपासण्यासाठी काही निकष आहेत. जस कि , जर महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ती महिला योजनेसाठी पात्र नाही. तसेच, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल किंवा महिलेच्या नावावर दुचाकी वाहन असेल तर अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच परराज्यात विवाह झालेल्या आणि परराज्यात स्थायिक झालेल्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर आधार कार्ड आणि बँक खाते यात विसंगती असल्यासही ती महिला अयोग्य ठरवली जाईल.
अदिती तटकरे यांनी हेही सांगितले की, महिला लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. आणि पात्र महिलांना लवकरच जानेवारी महिन्याचा लाभ दिला जाईल.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय कधी घेणार? मंत्री अदिती तटकरे यांनी केला मोठा खुलासा.