लाडकी बहीण योजने’चा फॉर्म भरायला उशीर झाला तर? अजित पवार यांनी सांगितली हकीकत

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Form Late Ajit Pawar Update (Image Credit: Facebook)

Majhi Ladki Bahin Yojana News In Marathi : बारामतीत आज ‘जन सन्मान रॅली’ दरम्यान अजित पवार ‘माझी लाडकी बहीण योजने’बद्दल बोलले. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला उशीर झाला तरी घाबरण्याचे कारण नाही असे ते म्हणाले. अजित पवार काय म्हणाले वाचा सविस्तर…

Majhi Ladki Bahin Yojana First Installment News In Marathi : आज बारामती मध्ये ‘जन सन्मान रॅली’ झाली. रॅलीवेळी अजित पवार यांनी महिलांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी महिलांना ‘माझी लाडकी बहीण योजने’बाबत जागृत केले. महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन अजित दादांनी यावेळी केले. ‘माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांच्या लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. याबाबत अजित पवार यांनी महिलांना आश्वस्त केले आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞
  • लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला उशीर झाला तरी घाबरू नका – जर एखाद्या भगिनीला फॉर्म भरायला उशीर झाला आणी त्यांनी ऑगस्टमध्ये जरी ‘लाडकी बहीण योजने’चा फॉर्म भरला तरी जुलै महिन्याचे दीड हजार रुपये त्या महिलांना ऑगस्टमध्ये दिले जातील, असे अजित पवार म्हणाले.
  • बारामतीच्या विकासासाठी १८० कोटी – पुढे ते म्हणाले की, मी जसा राज्याचा विचार केला तसंच मी बारामतीचा सुद्धा विचार केला. १८० कोटी रुपये बारामतीसाठी मिळणार आहेत. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी राज्याला ४६ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यातील महिला सक्षम व्हाव्या, महिलांनी आत्मनिर्भर बनावे हेच सरकारचं धोरण आहे. त्यासाठीच माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
  • महायुतीलाच निवडून द्या – विधानसभेला महायुतीलाच निवडून द्या. कुणीही येऊन कायतर सांगेल पण हा अजित दादा शब्द देणारा आहे. आम्ही उगाच काहीही खोटे बोलणारे नाही, सत्ता येते जाते. पण सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे. काल मी अमितभाई शाह यांना भेटलो, मी त्यांना साखरेबद्दल सुद्धा बोललो आहे. एमएसपी वाढवला पाहिजे असे मी त्यांना सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले.
  • जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा – माझी लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त भगिनींना लाभ मिळावा या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आम्ही वेळोवेळी योजनेत नवनवीन बदल करत आहोत. योजनेचे रोज मोठ्या संख्येने फॉर्म येत आहेत. तरी त्या फॉर्मची पडताळणी करण्याचे काम सुरु करण्यात आले असून, योजनेचा पहिला हफ्ता लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

.🔴 हे वाचल का? 👉 माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी कधी होणार जाहीर? जाणून घ्या Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List बद्दल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article