Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेच हमीपत्र अस करा अपलोड

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra Upload

How To Upload Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra : माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यापूर्वी हे जाणून घ्या. हमीपत्र चा अर्थ सेल्फ सर्टिफिकेट आहे. हमीपत्रावर सही करताना हमीपत्र एकदा काळजीपूर्वक वाचा. त्यात असणाऱ्या सर्व अटी समजून घेऊन मगच हमीपत्रावर सही करा. तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य आहे का नाही? यासाठी हे हमीपत्र आहे.

How to Upload Self Certificate : महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मदत मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. माझी लाडकी बहीण (Majhi Ladki Bahin Yojna) या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलांना एक हमीपत्र सही करून द्यावे लागणार आहे. हे हमीपत्रात (Self Certificate) म्हणजे नेमकं काय आहे? आणि हे हमीपत्र कसं भरून अपलोड करायचं आहे? ते सविस्तर जाणून घ्या…

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

हमीपत्र म्हणजे काय?

हमीपत्र चा अर्थ सेल्फ सर्टिफिकेट आहे. हमीपत्रावर सही करताना ते काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे. त्यातील सर्व अटी समजून घेऊन मगच त्यावर सही करणं गरजेचं आहे.

माझी लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र कसं भरायचं?

1. माझ्या कुटुंबाचं एकत्रिक वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त नाही.

2. माझ्याकडं उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास मला पिवळं किंवा केशरी रेशनकार्ड आधारवर उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी.

3. माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य आयकरदाता नाही.

4. मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियम/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.

5. मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी/ स्वयंसेवी कामगार/ कंत्राची कर्मचारी असून माझं उत्पन्न 2.50 लाख रुपये पेक्षा कमी आहे.

6. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.

7. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार नाही.

8. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन/ बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत.

9. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.

10. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही.

हमीपत्रात असणारे 10 मुद्दे वाचून तुम्हाला त्याच्या समोर असलेल्या बॉक्समध्ये बरोबर अशी खूण करायची आहे. आणी त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव लिहून सही करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारीशक्ती दूत अॅप मधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे.

🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana: हमीपत्रातील चौथ्या अटीमुळे ठरतायत अर्ज अपात्र, जाणून घ्या नेमकी काय आहे चौथी अट.

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?

अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर जमा केला जाणार आहे. 19 ऑगस्ट 2024 रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे एकत्र 3000 रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article