Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाकांक्षी आहेच, परंतु राज्यातील भगिनींनी या योजनेला दिलेला उदंड प्रतिसाद देखील खरोखरच ऐतिहासिक आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 5 महिन्यांचा लाभ वितरीत करण्यात आला असून 2 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचला आहे. आणी आता लवकरच लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 50 लाख ईतकी होईल. (October 15 is the last date to apply for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana. If approved, beneficiaries can receive Rs. 4500 in their bank accounts).
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर असून, शासनाकडून आधीच जाहीर करण्यात आल्याप्रमाने 15 ऑक्टोबरला रात्री 12 वाजेपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करता येतील.
राज्यात जुलै महिन्यापासून माझी लाडकी बाहीन योजना सुरु करण्यात आली असली तरी सध्या महिला ज्या महिन्यात अर्ज करतील त्याच महिन्यापासूनचा लाभ महिलांना दिला जातो आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणी नोव्हेंबर महिन्यांचे हफ्ते जमा करण्यात आले आहेत.
तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केला आणी तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुमच्या खात्यात 4500 रुपये जमा होऊ शकतात. कारण, येत्या 8-10 दिवसात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकत असल्याने महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर सोबत नोव्हेंबर महिन्याचेही पैसे आधीच जमा करण्यात आले आहेत. तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यात नवीन अर्ज केला असेल आणी जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर आणी डिसेंबर असे तीन महिन्यांचे मिळून एकत्रित 4500 रुपये जमा केले जाऊ शकतात.
त्यामुळेच तुम्ही जर अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर नवीन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 1च दिवस शिल्लक आहे. आणी 4500 रुपये मिळवण्याचीही ही शेवटची संधी ठरू शकते.