Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी चालविलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत दरमहा देण्यात येणाऱ्या रकमेच्या वाढीची घोषणा केली आहे. आता पात्र महिलांना योजनेच्या अंतर्गत 2100 रुपये देण्यात येणार आहेत. (Maharashtra CM Eknath Shinde announces an increase in monthly benefits under Majhi Ladki Bahin Yojana. Eligible women will now receive ₹2100 per month. Check eligibility and application process).
महिलांसाठी मोठी आर्थिक मदत
Majhi Ladki Bahin Yojana Latest News 2100 Rupees Announcement : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ही त्या योजनांपैकी एक महत्त्वाची योजना असून, सुरुवातीला योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात होते. मात्र, या महिन्यापासून पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये देण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीनंतर आपल्या भाषणात सांगितले: “हे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. मी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानतो आणि त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा वचनबद्धपणे प्रयत्न करतो. आता पात्र महिलांना दरमहा 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केले जातील.” अस एकनाथ शिंदे म्हणाले.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्या खात्यात 2100 जमा होणार की नाही? ही नवीन यादी चेक करा Majhi Ladki Bahin Yojana New List Check Online.
योजनेची पात्रता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक.
- वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी:
- जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा.
- सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करा.
- अर्ज पात्र ठरल्यास महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल.
नवीन वाढीव रक्कम लवकरच खात्यात
पात्र महिलांच्या खात्यात नवीन वाढीव रक्कम लवकरच जमा केली जाईल. यासाठी अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔴 हेही वाचा 👉 या तारखेपासून महिलांना मिळणार 2,100 रुपये! समोर आली तारीख Majhi Ladki Bahin Yojana Latest News.