Majhi Ladki Bahin Yojana: पुण्यातून एक क्लिक, करोडो महिलांच्या खात्यात 3000 रुपये झालेच जमा!

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Latest News First Installment 17 august

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News Today Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण होईल. माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्याच्या खास प्रसंगी राज्य सरकारने पुण्यात एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्याद्वारे सुरु करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला खूपच मोठा प्रतिसाद मिळाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांनी अर्ज केले आहेत आणि आतापर्यंत एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. या अर्ज पात्र ठरलेल्या महिलांना येत्या शनिवारी 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्याचा मोठा कार्यक्रम  होणार आहे. आजच्या बैठकीत या कार्यक्रमा संदर्भात निर्णय होणार आहे.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर येत्या शनिवारी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्रीही हजर असतील.

एक क्लिक करताच पैसे खात्यात जमा

शनिवारी पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमातून एक क्लिक करताच 1 कोटी 34 लाखांहून अधिक महिलांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार आहेत.

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज Approved झाला नाही? मग करा हे काम.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article